जळगाव : पोलिस कल्याण निधीसाठी ‘तरंग’ स्नेहमेळावा रविवारी पार जळगावात जिल्हा पोलीस प्रशासनाकडून पार पडला. सुप्रसिद्ध पार्श्वगायिका वैशाली माडे यांच्या सदाबहार गाण्यांनी कार्यक्रमाची दमदार सुरुवात झाली. ‘चला हवा येऊ द्या’ फेम टीमचे भाऊ कदम, कुशल बद्रिके, श्रेया बुगडे, सागर कारंडे, भारत गणेशपुरे यांच्या भन्नाट कॉमेडीने उपस्थित खळखळून हसले तर जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी यावेळी पल पल दिल के पास हे सदाबहार गीत सादर केल्यानंतर त्यास उपस्थितांनी भरभरून दाद दिली. सर्वसामान्यांच्या रक्षणासाठी अहोरात्र झटणार्या पोलिस अधिकार्यांसह कर्मचार्यांना या कार्यक्रमामुळे काहीसा दिलासा मिळाला.
या कार्यक्रमाला पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, महापौर जयश्री महाजन, पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, सहाय्यक अधीक्षक कुमार चिंथा यांच्यासह इतर अधिकारी, आमदार, मान्यवर व पोलिस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




