;

भुसावळ – वरणगाव येथे पेट्रोल, डिझेल, गॅस, तेल यांचे दिवसेंदिवस वाढत असलेले दराला केंद्र सरकार जबाबदार असल्याने त्यांच्या विरोधात युवा सेना-शिवसेना यांनी रविवारी सायंकाळी 7 वाजता बस स्टॅन्ड चौकात पंतप्रधान मोदी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून उपरोधीक ‘थाळी बजाओ’ आंदोलन केले
युवा सेना सचिव वरूण सरदेसाई यांच्या आदेशाने रविवारी संपूर्ण राज्यात दररोज गगनाला भिडलेले पेट्रोल, डिझेल, खाण्याचे तेल, गॅस सिलिंडर यांचे वाढत असलेले रोजचे दर यामुळे सामान्य जनता त्रस्त झाली आहे. रोज वाढत असलेल्या भाववाढच्या विरोधात वरणगाव येथे युवा सेना-शिवसेना यांच्या वतीने बस स्टॅन्ड चौकात सायंकाळी 7 वाजता पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात ‘वारे मोदी तेरा खेल..सस्ती दारू महेगा तेल’, ‘बहोत हॊ गयी महंगाई की मार…होश मे आवो मोदी सरकार’, थाली बजाओ खुशिया मनाओ, अशा विविध प्रकारच्या घोषणा देऊन बस स्टॅन्ड परिसर घोषणानी दाणानून गेला होता.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन, युवासेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत शर्मा, जिल्हा संघटक विलास मुळे, उपतालुका प्रमुख सुभाष चौधरी, अल्पसंख्याक समाजाचे नेते सय्यद हिप्पी शेठ,शहरप्रमुख संतोष माळी, निलेश ठाकूर, तालुका अल्पसंख्याक संघटक मोहसीन खान, सईद मुल्लाजी, वकील शेख, सुरेश चौधरी, उपशहर प्रमुख कालू शर्मा, आबा सोनार, शहर संघटक हर्षल वंजारी, बाळा माळी, शहर समन्वयक किरण माळी, विलास वंजारी, सुनील देवघाटोळे, मुजाहिद खान, सुफियान शेख, संदीप वाणी, उमाकांत झांबरे, यशवंत बढे, बाळू माळी, निलेश काळे, किरण माळी, संकेत माळी, पवन माळी, रितेश माळी, कुणाल माळी, अतुल पाटील, नितीन पाटील, कृष्णा पुजारी, किरण माळी, वैभव लोखंडे, दिपक शेडके, प्रकाश कोळी, भुरा पाटील यांच्यासह युवा सेना शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



