भुसावळ – पनवेल आणि प्रयागराज दरम्यान होळी विशेष (४ फेऱ्या)
04116 विशेष दि. २१.३.२०२२ आणि २८.३.२०२२ रोजी २२.३० वाजता पनवेल येथून सुटेल आणि प्रयागराज येथे तिसर्या दिवशी ०३.३५ वाजता पोहोचेल.

04115 अतिजलद विशेष प्रयागराज येथून दि. २०.३.२०२२ आणि २७.३.२०२२ रोजी १७.२५ वाजता सुटेल आणि पनवेल येथे दुसऱ्या दिवशी २०.५० वाजता पोहोचेल.
थांबे: कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, खंडवा, इटारसी, भोपाळ, बिना, ललितपूर, टिकमगड, खरगापूर, एमसीएस छतरपूर, खजुराहो, महोबा, बांदा, चित्रकूट धाम कारवी, माणिकपूर, शंकरगड आणि नैनी.
संरचना: दोन तृतीय वातानुकूलित, १२ शयनयान, ६ सामान्य द्वितीय श्रेणी.
आरक्षण: सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर दि. १९.३.२०२२ पासून विशेष शुल्कासह विशेष ट्रेन क्रमांक 04116 चे बुकिंग सुरू होईल.
प्रवाशांना त्यांच्या आणि इतरांच्या सुरक्षिततेसाठी कोविड योग्य वर्तन पाळण्याचा सल्ला दिला जातो.


