भुसावळमधे १९ एप्रिल रोजी चौथ्यांदा सामुहिक विवाहाचे आयोजन ; भोरगाव लेवा पंचायत ठाया पाडळसे :

भुसावळ -भोरगाव लेवा पंचायत भुसावळ शाखेच्या सभेत 19 एप्रिल 2022 मंगळवार रोजी चौथ्यांदा सामुहिक विवाहाचे आयोजन करण्याचे ठरविण्यात आले. समाजातील अनिष्ट रूढी परंपरा, सामाजिक समस्या व खर्चिक लग्न पध्दतीला आळा बसावा म्हणून, लोकाग्रहास्तव, नुकताच डिसेंबर मधे मेळावा झाला असला तरी पुन्हा 19 एप्रिलला हे आयोजन करण्यात येणार आहे. तरी ज्या मुला-मुलींचे लग्न ठरले आहे त्यांनी त्वरीत नावे नोंदणी करावी. या सोहळ्यात वैदिक पध्दतीने विवाह विधी केला जाईल व संस्थे तर्फे गॅस शेगडी, सिलेंडर. मिक्सर, कुकर,संसारोपयोगी साहित्य, पैठणी, व ड्रेस भेट म्हणून दिले जाईल. वधुवरांना देण्यात येणा-या संसारोपयोगी वस्तूंची किंमत प्रत्येकी 20,000रू. असेल. तरी या विवाहोच्छूक युवक युवक युवतींनी पुढील ठिकाणी संपर्क करावा.. भोरगाव लेवा पंचायत भुसावळ शाखा आँफीस हॉटेल मल्हार शेजारी. 9050737407
पुरूषोत्तम मेडिकल जामनेर रोड भुसावळ येेेथे
असे आवाहन उपक्रम चेअरमन आरती चौधरी यांनी केले आहे.
या मिटींग मधे पुढिल प्रमाणे संचालक उपस्थित होते
कुटुंबनायक रमेशदादा पाटील. अध्यक्ष अँड. प्रकाश पाटील, सचिव डॉ. बाळू पाटील, सुहासदादा चौधरी, आरती चौधरी परीक्षित ब-हाटे, निळकंठ फालक, महेश फालक. मंगला पाटील, डिगंबर महाजन. शरद फेगडे, रघुनाथ चौधरीहे संचालक उपस्थित होते