चार राज्यात भाजपाला स्पष्ट बहुमत : भुसावळात भाजपा पदाधिकारी यांनीं वाद्याच्या तालावर नाचत केला आनंद साजरा ;


भुसावळ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून देशातील पाच पैकी चार राज्यात भाजपाला मतदारांनी स्पष्ट कौलह दिल्यानंतर भुसावळातील स्थानिक भाजपा पदाधिकार्‍यांनी वाद्याच्या तालावर थिरकत, फटाके फोडून व बुंदीचे लाडू वाटप करून गुरुवारी दुपारी आनंदोत्सव साजरा केला. उत्तरप्रदेशसह उत्तराखंड, गोवा मणिपूर या चार राज्यात भाजपाला मतदारांनी कौल दिल्याचे स्पष्ट झाल्यानंतर शहरातील बाजारपेठ पोलिस ठाण्यासह जामनेर रोडवरील शिवाजी कॉम्प्लेक्सखाली भाजपा पदाधिकार्‍यांनी ढोल-ताशांच्या गजरात नृत्य करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपाचा जयघोष केला.
यांची होती उपस्थिती
प्रसंगी भाजपा शहराध्यक्ष परीक्षीत बर्‍हाटे, माजी प्रभारी नगराध्यक्ष युवराज लोणारी, भाजपा शहर सरचिटणीस रमाशंकर दुबे, माजी नगरसेवक राजेंद्र नाटकर, प्रा.दिनेश राठी, राजेंद्र आवटे, गिरीश महाजन, अजय नागराणी, निकी बत्रा, महिला आघाडी शहराध्यक्षा शैलजा पाटील, भारती वैष्णव, जिल्हा उपाध्यक्ष अजय भोळे, जयंतीलाल सुराणा, राजीव सुराणा, अनिरुद्ध कुलकर्णी, नारायण रणधीर, राजू खरारे, अर्जुन खरारे, चेतन सावकारे, प्रसन्न पांडे, नंदकिशोर बडगुजर आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.