दीपशिखा महीला कल्याण समिती ऑ.फॅ.भुसावळ येथे विविध कार्यक्रमांनी महिला दिन साजरा ;


भुसावळ – दरवर्षी प्रमाणे यंदाही 8 मार्च जागतिक महिला दिवसानिमित्त दीपशिखा महिला कल्याण समिति ऑ.फॅ भुसावळ तर्फे सिनिअर क्लब येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले
या मध्ये विशेष नृत्य स्पर्धा , तसेच महिलांना या दिवशी विशेष भेटवस्तू देण्यात आल्या
दीपशिखा महिला कल्याण समिती अध्यक्षा श्रीमती वैजयंती निमजे यांनी महिलांना विशेष मार्गदर्शन केले.
फॅक्टरी मधील महिलांसाठी
वर्षभर वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते महिलांच्या शरीर स्वास्थ्यासाठी लेडीज जिम
ओपन जिम ,झुम्बा डान्स , योगा क्लास तसेच फेब्रुवारी मध्ये स्पोर्ट डे चे आयोजन केले होते . त्यामध्ये संगीत खुर्ची, रनिंग रेस,
बलून रेस ,रस्सी खेच अशा अनेक खेळांचे आयोजन महिलांसाठी केले होते त्यामध्ये सर्व महिलांनी भाग घेतला होता विजेत्या महिलांना विशेष पुरस्कार देण्यात आले आणि लवकरच मुलींच्या स्वसंरक्षणासाठी कराटे क्लासेस सुरु करणार आहेत अशी माहिती दीपशिखा महिला कल्याण समिति अध्यक्षा वैजयंती निमजे यानी यावेळी दिली.उपस्थित महिलांना 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या .