नाहाटा ‘महाविद्यालयात स्वंयसिद्धा अभियान कार्यशाळा संपन्न


भुसावळ प्रतिनिधी -विद्यार्थ्यांनी ज्ञानाबरोबरच आपल्या बौद्धिक क्षमता, शारीरिक क्षमता वाढविल्या पाहिजे . जगात कसे वागावे, कसे आचरण करावे . हे ज्ञानार्जनाने सिद्ध होते . असे प्रतिपादन उपप्राचार्य डॉ एस व्ही पाटील यानी व्यक्त केले .कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ व येथील भुसावळ कला, विज्ञान आणि पु. ओं नाहाटा वाणिज्य महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या स्वंयसिद्धा अभियान कार्यशाळेच्या कार्यक्रमात ते बोलत होते . व्यासपीठावर उपप्राचार्य डॉ एस व्ही पाटील, उपप्राचार्य डॉ एन ई भंगाळे ताप्ती स्कूलचे गोपाळ जोनवाल, प्रमिला जोनवाल, डॉ विद्या पाटील डॉ किरण वारके आदी उपस्थित होते . उपप्राचार्य डॉ एस व्ही पाटील म्हणाले – विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात आयोजित होणाऱ्या सर्व कार्यक्रमांना विद्यार्थ्यांनी आपले लेक्चर्स अटेंड करून उपस्थिती द्यावी . व आपल्या स्वयंसिद्धा कार्यक्रमांतर्गत आपल्याला मिळणाऱ्या प्रशिक्षणामध्ये विद्यार्थिनींनी आपल्यावर ओढणाऱ्या संकटांवर मात करून येणाऱ्या संकटाशी सामना करून जशास तसे उत्तर कसे द्यावे .अशी अपेक्षा उपप्राचार्य डॉ एस व्ही पाटील यांनी व्यक्त केली . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाविद्यालयाची विद्यार्थिनी निकिता पाटील हिने केले तर प्रास्ताविक प्रा डॉ किरण वारके यांनी केले . उपस्थितांचे आभार वैष्णवी पाटील हिने मानले . कार्यक्रमाला प्राचार्या डॉ एम व्ही वायकोळे,उपप्राचार्य डॉ बी एच ब-हाटे, उपप्राचार्य डॉ ए डी गोस्वामी यांचे मार्गदर्शन लाभले . प्रा डॉ सचिन राजपुत प्रा जितेंद्र आडोकार यांनी परिश्रम घेतले यावेळी विद्यार्थिनी उपस्थित होत्या .