विद्यार्थ्यानीं खेळा सोबत आपला आहार व आरोग्य जपावे – डॉ सुवर्णा गाडेकर : गोसेवक परिवारातर्फे महिलांचा सन्मान ;

भुसावळ – येथील गोसेवक परिवारातर्फे आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त समाजातील विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्यां महिलांचा सन्मान करण्यात आला .
स्थानिक ताप्ती पब्लिक स्कूल मैदानावर आयोजित कार्यक्रमास प्रारंभी भारतमातेच्या प्रतिमेस डॉ सुवर्णा गाडेकर , पत्रकार उज्वला बागुल, यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले . यावेळी अँड जास्वंदी भंडारी , सौ माया चौधरीं , महिला पोलिस कर्मचारी सीमा चौधरीं , अर्चना अहिरे , ललिता बारी , संगीता साबळे यांचेसह महिला भगिनी उपस्थित होत्या . यावेळी गोसेवक रोहित महाले यांनी उपस्थित महिलांना भेटवस्तू देवून सन्मानित केले .
दरम्यान उपस्थित खेळाडू विद्यार्थिनी यांना स्त्री रोग तज्ञ डॉ सुवर्णा गाडेकर यांनी आजच्या मुली देशाचे व राष्ट्राचे उज्वल भविष्य असून त्यांनी खेळा सोबत आपला आहार व आरोग्य जपावे याबाबत जागृत असले पाहिजे आरोग्यकडे दुर्लक्ष करु नये , ध्येय जिद्द व चिकाटी ठेवा यश निश्चित आहे असा सल्ला विद्यार्थिनी यांना देवून शुभेच्छा दिल्या व मार्गदर्शन केले . गोसेवक रोहित महाले यांची गोमाता प्रती असलेली तळमळ बघून जास्वंदी भंडारी यांनी शहरात गोमातेसह मुक्याप्राणी यांच्या उपचाराकरीता रुग्णालय नसल्याने पालिकेने लवकर नव्याने रुग्णालय उपलब्ध करून द्यावे जेणे करून गोसेवक महाले यांचा अणवाणी राहण्याचा नवस लवकर पूर्ण होंईल व या कार्यासाठी त्यांचे सोबत सर्व असल्याची ग्वाही दिली . उज्वला बागुल , रोहित महाले यांनी मनोगत व्यक्त केले .
कार्यक्रम यशस्वितेकरीता गोसेवक रोहित महाले , मंदार बागुल , वरुण भागवत ,शुभम जाधव , हर्ष सावंत , खुशाल राम यांचेसह गोसेवक परिवार सदस्य यांनी परिश्रम घेतले .