वरणगावमध्ये शिवसेनेतर्फे कर्तुत्ववान महिलांचा सन्मान : महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रातील काम करणाऱ्या महिला भारावल्या :

वरणगाव – जागतिक महिला दिनानिमित्त वरणगाव शहर शिवसेनेच्यावतीने विविध क्षेत्रात कर्तृत्व गाजवणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला. हा सन्मान केल्याने कर्तुत्व गाजवणारे महिला भारावून गेल्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्त्रीरोग तज्ञ डॉ.सौ.तनुजा राहुल भोईटे होत्या. प्रमुख अतिथीमध्ये सामाजिक कार्य करणाऱ्या सविता सखाराम माळी, तृप्ता समाधान महाजन, ग्रामीण रुग्णालयाच्या डॉ. शितल साळुंखे, जर्जीस फाउंडेशन अध्यक्षा शबीना खान, बचत गट सीआरपी सीमा तायडे, शिवसेना महिला आघाडीच्या योगिता आबा सोनार, उषा सुभाष चौधरी क्रांतीसुर्य बचत गटाच्या अध्यक्षा शैला संतोष माळी या उपस्थित होत्या. डॉ. तनुजा भोईटे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की, महिलांचे जसे आरोग्याकडे लक्ष असते तसे तुम्ही डिजिटली स्मार्ट व्हा, प्रत्येकाकडे आज स्मार्टफोन आहे. त्यातील सेफ्टी ऐप वापरणे शिका, घरी बसल्या बसल्या मोबाईलवरून किती तरी कामे होऊ शकता. कुठल्या ऐप ची आपण काळजी घेतली गेली पाहिजे हे देखील महत्वाचे आहे. बऱ्याच महिलांना याची माहिती नसते म्हणून नुसते स्मार्ट फोन वापरून उपयोग नाही तर तुम्ही स्मार्ट बना असा मोलाचा सल्ला यावेळी डॉ. तनुजा भोईटे यांनी उपस्थित महिलांना दिला. या महिलांचा झाला सन्मान – विविध क्षेत्रात कर्तुत्व करणाऱ्या महिलांमध्ये वैद्यकीय क्षेत्र – डॉ. तनुजा भोईटे, डॉ. शितल साळुंखे, परिचारिका डॉ.ज्योती गुरव. शिक्षण क्षेत्र- संगीता चौधरी. सामाजिक क्षेत्र- सविता माळी, लक्ष्मी बैरागी, शबीना खान, शगुफ्ता खान, सीमा तायडे. व्यवसाय क्षेत्र – योगिता निलेश पाटील यांच्यासह मोलकरीणचे काम करणारी साधना सखाराम तायडे यांचा सन्मान करण्यात आला. मेहंदी स्पर्धेत भारतात तिसरी आणि जळगांव जिल्ह्यात पाहिली आलेली कु.सायली सुनील सिंगार हिचा देखील सन्मान केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवसेना शहर प्रमुख संतोष माळी यांनी केले. आभार कु.दिशा महाजन हिने मानले. यशस्वीतेसाठी वरणगाव शिवसेना परिवारातील पदाधिकारी शिवसैनिक यांनी परिश्रम घेतले.