भुसावळ – महिला दिनाच्या पूर्वसंध्येला भुसावळ येथील साईलीला महिला बचत गटाकडून कष्टकरी महिलांचा अपघात विमा काढून महिला दिन साजरा केला, हा उपक्रम करून एक वेगळी माणुसकी गटाने जपली.
रानातला महादेव मंदिर येथे कार्यक्रम घेऊन डबर फोडणार्या ,रेती उचलणार्या ,मोलमजुरी करणाऱ्या दहा महिलांचा ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीचा तीन वर्षाचा अपघात विमा काढून या महिलांना कठीण प्रसंगी आर्थिक आधार मिळावा हा दृष्टिकोन समोर ठेवून साईलीला बचत गटाकडून हा आगळावेगळा उपक्रम करण्यात आला.
यावेळी गटाच्या प्रत्येक महिलेने एका महिलेचा विमा काढण्याची जबाबदारी घेऊन प्रत्येक महिलेला महिला दिनाच्या पूर्वसंध्येला या महिलांनी ही पॉलिसी दिली. विमाधारक महिलांना यावेळी अगदी भरून आलं व आमचा पण असा कोणी विचार करते असं त्यांनी सांगितले.

“ या कष्टकरी महिलांना महिला दिवस काय ही माहिती नाही आम्ही केलेल्या छोट्याशा प्रयत्नातून या महिलांच्या चेहऱ्यावर जो आनंद आला हे पाहून आम्ही केलेले उपक्रम सार्थक झाले असे वाटते . असे मत कार्यक्रमात गटाच्या अध्यक्षा ॲड जास्वंदी भंडारी यांनी व्यक्त केले.
आनंद अधिक द्विगुणीत व्हावा यासाठी या महिलांसोबत महिला दिनाचे औचित्य साधून केकही कापण्यात आला.
सौ कनाबाई तारासिंग मानकर, सौ शारदा दिनेश मानकर, भारती नथु धुपे, आशा गजानन पाखरे, अनिता कैलास मानकर , रेणुका किशोर इंगळे, मनीषा सुनील मानकर, रिचा रवी मानकर, बाला विशाल अहिरे या महिलांना विमा पॉलिसी देण्यात आली. बचत गटाच्या सौ नेहा यावलकर ,संध्या चौधरी, सुनिता सुनिल राणे ,मनीषा बर्हाटे, वैशाली हिरे ,मंगला सुलाखे ,रेखा धुपे , सुनिता अनिल राणे , मनीषा भंडारी ,अनिता राणे ॲड जास्वंदी भंडारी यांनी सहकार्य केले . दीपप्रज्वलन व भारतमाता पुजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.


