विविध विषयांवर महिलांचे समुपदेशन हाच कार्याचा ध्यास घेतलेल्या – आरती चौधरी

विविध विषयांवर महिलांचे समुपदेशन हाच कार्याचा ध्यास घेतलेल्या आरती चौधरी

भुसावळ – विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांना भेडसावणाऱ्या समस्या अथवा अडचणी कशा दूर करता येतील या अनुषंगाने त्यांना समुपदेशन करून योग्य ते मार्गदर्शन करण्याचे काम भुसावळ येथील सक्षम सेवा फाउंडेशनच्या अध्यक्ष सौ. आरती सारंग चौधरी गेल्या काही वर्षांपासून करत आहेत.
सौ. आरती चौधरी यांचे शिक्षण
बी. ए. पॉलिटिकल सायन्स झाले असून त्या पोस्ट ग्रॅज्युएट, डिप्लोमा, सिंबोयसिस, पुणे
कौन्सिलींग कोर्स,कर्वे इन्स्टिटय़ुट, पुणे गोल्ड मेडलीस्ट इन ज्यूडो मार्शल आर्टस मॅनेजींग डायरेक्टर असे शिक्षण घेतले आहे. सक्षम कौन्सिलींग सेंटर, भुसावळच्या माध्यमातून खेड्यातील मुलींचे व विवाहीत स्त्रियांचे प्रश्न समजून घेऊन त्यांना समुपदेशनाचे काम पूर्णपणे मोफत केले जाते. गेल्या ४ वर्षांपासून विवाहपूर्व व वैवाहिक जीवनात अडचणी आल्यास मोफत समुपदेशन केले जाते. ज्येष्ठ नागरिकांसाठी सुध्दा मोफत मार्गदर्शन व समुपदेशन, ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध खेळांचे आयोजन व प्रोत्साहनासाठी बक्षिसे वाटप केली जातात. शालेय गरीब मुलांसाठी अभ्यास टेन्शन फ्री असावा यासाठी मोफत मार्गदर्शन केले जाते. शालेय मुलांसाठी मोफत अँप्टीट्युड टेस्ट करण्यात येते. वयात येणाऱ्या मुलींना खेड्यातील शाळांमध्ये जाऊन मार्गदर्शन व शारीरिक स्वच्छतेसाठी व्याख्याने त्यांनी दिलेली आहेत. खेळांचा मानसिकतेवर सकारात्मक परिणाम होतो म्हणून क्रिडा मंडळातर्फे 40 वर्षे वयावरील महिलांसाठी खेळांच्या स्पर्धांचे यशस्वी आयोजन केले जाते व त्याला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो. मुलींना स्वसंरक्षणासाठी मार्गदर्शन छोट्या टीप्स देण्यात येतात. अनेक शाळांमधे व कॉलेजमध्ये स्वयंसिद्धा अंतर्गत शारीरिक व मानसिक दृष्ट्या सक्षम होण्यासाठी त्यांनी कार्यक्रम घेतले आहेत. आतापर्यंत अनेक जोडप्यांचे मोफत सामुपदेन केले असून त्यापैकी घटस्फोटापर्यंत पोहोचलेल्या ९ जोडप्यांचे यशस्वी समुपदेशन करून ते सुखाने संसार करत आहेत. गरीब कुटुंबांवरील आर्थिक ताण कमी व्हावा म्हणून 16 मार्च 2021 रोजी भुसावळमध्ये प्रथमच 5 जोडप्यांचे सामुहिक विवाहाचे यशस्वी आयोजन केले होते. त्यात एक जोडपे अंध होते. 9 डिसेंबर 2021 रोजी 15 जोडप्यांचा सामूहिक विवाहासाठी संस्थेतर्फे पुढाकार घेण्यात आला. 15 जोडप्यांचे विवाहपूर्व समुपदेशन करून सुखी संसारासाठी मार्गदर्शन केले. गेल्या 4 वर्षांपासुन शाळांमधून गरीब मुलांसाठी मध्ये मोफत कौन्सिलींगचे कार्य केले जात आहे. यावर्षी महिला पोलिसांवरील ताण लक्षात घेऊन त्यांची शारीरिक आरोग्य तपासणी, त्यांना मोफत कॅल्शिअम, आयर्नच्या गोळ्यांचे तीन महिन्यांसाठी वाटप करण्यात आले. महिला ट्राॅफिक पोलीसांना प्रोत्साहन मिळावे यासाठी कार्यक्रम व भेटवस्तू वाटप काही वर्षांपासून हा उपक्रम सुरु आहे. काेरोनापासून बचावासाठी गरीब लोकांना व मुलांना मास्क सॅनेटायझर वाटप करण्यात आले. पर्यावरणपूरक प्लांट बँकची निर्मिती व यशस्वी वाटचाल त्यांची सुरू आहे.
सौ. आरती चौधरी या स्वतः गेल्या 8 वर्षांपासून कचऱ्यापासून गांडूळखत निर्मिती करतात व त्यासंदर्भात अनेक महिलांना प्रोत्साहन व मार्गदर्शन सुध्दा केले जाते. मार्शल आर्ट ज्यूडोसंबंधी मुलींना मार्गदर्शन करत असतात. सौ. आरती चौधरी या विविध पदे भूषवित आहेत. अध्यक्ष – सक्षम सेवा फाउंडेशन, प्रमुख – सक्षम कौन्सिलींग सेंटर, अध्यक्ष – महिला क्रिडा मंडळ, उपजिल्हाध्यक्ष – महिला सुरक्षा संघटना, कार्यकारी अध्यक्ष – पर्यावरण सखी मंच, प्रमुख – प्लांट बँक (रोप बँक), उपाध्यक्ष – रोटरी क्लब भुसावळ, संचालिका – अन्नपूर्णा सहकारी पतसंस्था यावल, ऑनररी मेंबर – आय.सी.सी. कमिटी, उल्हास पाटील मेडिकल कॉलेज, ऑनररी कौन्सिलर भुसावळ आर्ट्स सायन्स अ‍ॅण्ड पी.ओ. नाहाटा काॅमर्स कॉलेज भुसावळ, माजी अध्यक्षा – इनरव्हील क्लब, संचालिका – बी.जी.एल.पी. पंचायत, मेंबर – महिला दक्षता समिती, भुसावळ.