साकळी – फार्मर प्रोड्यूसर कंपनी तर्फे शेतकरी प्रशिक्षण व मार्गदर्शन कार्यशाळा साकळी ता.यावल येथे दि.३ रोजी सकाळी ९ वाजता नेवे साकळी पीक संरक्षण सोसायटीच्या सभागृहात आयोजित करण्यात आले आहे.
या कार्यशाळेला महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाचे उपसंचालक अनिल भोकरे सर, पाल येथील कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख कथा वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ.महेश महाजन, तंत्र सहाय्यक संजय पवार (जळगाव) यावल तालुका कृषी अधिकारी सागर सिनारे आदी मान्यवर अधिकारी शेतकऱ्यांना सखोल मार्गदर्शन करणार आहे. केंद्र व राज्य शासनाच्या कृषी संबंधी विविध योजना व शेती पूरक व्यवसाय तसेच शेतीसाठी येणारे नवनवीन तंत्रज्ञान व त्याचा शेतकऱ्यांना होणारा फायदा अशा विविध विषयांवर मार्गदर्शन करणार आहे
याप्रसंगी जेडीसीसी बँकेचे संचालक विनोद पाटील, जळगाव जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती रविंद्र पाटील, माजी जि.प.सदस्य वसंतराव महाजन, मंडळ अधिकारी अजय खैरनार (यावल) साकळी आयडीबीआय बँकेचे व्यवस्थापक विवेक यावले, साकळीचे सरपंच सौ.सुषमा पाटील हे विशेष अतिथी उपस्थित राहणार आहे. तर जितेंद्र नेवे (छोटूबाबा),दिपक पाटील,गणेश दादा नेहेते,सय्यद अहमद सय्यद मीरा,मोहसिनखान हाजी असिफखान, रविंद्रसिंग यादव, हितेंद्र चौधरी, प्रमोद सोळंके, किरण महाजन हे प्रमुख पाहुणे असणार आहे.
तरी या कार्यशाळेस साकळी सह परिसरातील शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे व लाभ घ्यावा. असे आवाहन नेवे फार्मर प्रोड्यूसर कंपनीचे संचालक विलास नेवे(साकळी) यांनी केलेल आहे.



