भुसावळ (प्रतिनिधी) – भुसावळ कला, विज्ञान आणि पु. ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात पदार्थविज्ञान व इलेक्ट्रॉनिक्स विभागातर्फे ‘राष्ट्रीय विज्ञान दिवस’ साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विभागप्रमुख प्रा. ई .जी. नेहेते होते . भारतरत्न डॉ. सी.व्ही.रमण यांच्या प्रतिमेला डॉ.वाय.के.चौधरी यांनी माल्यार्पण केले. यावेळी प्रा. ई .जी.नेहेते अध्यक्षस्थानावरून म्हणाले – डॉ .सी .व्ही रमण हे भौतिशास्त्रातील नोबेल पुरस्कार प्राप्त प्रथम भारतीय व्यक्ती असून आजच्या विद्यार्थानी त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन, विज्ञाननिष्ठ होऊन संशोधन करणे गरजेचे आहे . सुत्रसंचलन प्रा .व्ही.डी . जैन यांनी केले . तर आभार प्रा. डॉ.एन.एस.पाटील यांनी मानले . सदर कार्यक्रमात प्रा.महेंद्र ह्याळिंगे, प्रा.कोमल सरोदे, प्रा.प्रणाली भोगे, प्रा.भाग्यश्री भोळे प्रा . प्रा. हर्षल गंगावणे, प्रा . मनाली श्रीगोंदेकर, प्रा.सायली सोनवणे, प्रा .मिनल झोपे, प्रयोगशाळा परिचर प्रवीण सपकाळे, शिक्षकेतर कर्मचारी व पदवी, पदव्युत्तर वर्गातील विद्यार्थ्यांची उपस्थित होती.



