भुसावळात मोठा अपघात टळला : भरधाव टेम्पो दुकानावर आदळला –

भुसावळ : शहरातील जामनेर रोडवरुन जळगाव-भुसावळ डेली माल वाहतूक करणारे 777/407 वाहन जामनेर रोडवरील तिरुपती पेट्रोल पंपाजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने हे वाहन (एम.एच.04 ई.वाय.4549) हे दुभाजक व गटारी ओलांडून रस्त्याच्या दुसर्‍या लेनमध्ये शिरल्यानंतर रस्त्याच्या कडेला असलेल्या बंद सलुनच्या दुकानावर आदळले. या अपघातात दोन दुचाकींचे नुकसान झाले तर सुदैवाने मोठा अपघात टळला. दरम्यान, शहरातील प्रमुख रस्त्यांवरुनही आता अवजड व भरधाव वेगाने धावणार्‍या वाहनांचा प्रश्न गंभीर होत आसून अपघाताप्रकरणी रात्री उशिरापर्यंत बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल नसल्याचे सूत्रांनी सांगितले.