शासकीय कामात अडथळा आणून अधिकारी व कर्मचारी यांना शिविगाळ करणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल :

भुसावळ – शहरातील गरुड प्लॉट भागातील रहिवासी याने अतिक्रमण हटवताना शासकीय कामात अडथळा आणून अधिकारी यांना शिविगाळ केल्याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

शहरातील गरुड प्लॉट भागातील रहिवासी राजू बाबूलाल चंदन यांचे घर अतिक्रमण असल्याने नगरपरिषदेने त्यास यापूर्वी नोटीस देऊनही त्याने त्याचे राहते घराचे अतिक्रमण काढलेले नसल्याने नगरपरिषदेचे शासकीय काम करणारे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अंगावर धावून आल्याने त्यांचे विरुद्ध शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे की, फिर्यादी सचिन अरुण नारखेडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दिनांक २४/०२/२०२२ रोजी दुपारी ०५. वाजेला भुसावळ शहरात गरुड प्लॉट भागात राजू बाबूलाल चंदन नगरपरिषद मधील अधिकारी व कर्मचारी असे अतिक्रमण काढण्याच्या शासकीय काम करीत
असतांना गरुड प्लॉट भागातील रहिवासी राजू बाबूलाल चंदन यांचे राहते घरी अतिक्रमण असल्याने व त्यास यापूर्वी लेखी नोटीस देवूनही त्याने त्याचे राहते घराचे अतिक्रमण काढलेले नसल्याने दिनांक २४ फेब्रुवारी २०२२ रोजी त्याचे राहते घराचे अतिक्रमण काढत असतांना राजू चंदन याने मोठमोठयाने शिवीगाळ करत अतिक्रमण काढणास आलेले अधिकारी व कर्मचारी यांचे अंगावर धावून येऊन धक्काबुक्की करून त्याचे घराचे अतिक्रमण काढण्यात बालपूर्वक अडथळा निर्माण करून नगरपरिषदे शासकीय अधिकारी व कर्मचारी करत असलेल्या सरकारी कामात बालपूर्वक अडथळा निर्माण केला.
नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संदीप चिद्रीवार व विजय तोष्णीवर कनिष्ठ अभियंता बांधकाम विभाग नगरपरिषद भुसावळ यांनी दिलेल्या तोंडी तक्रारीवरून शहर पोलीस स्टेशनला गुरुन ००३६/२०२२ भा.द.वि कलम ३५३,५०४ प्रमाणे आरोपी राजू बाबूलाल चंदन यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गुन्ह्याचा पुढील तपास पो.निरी.गजानन पडघन करीत आहे.