भुसावळ : रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेल सिटीतर्फे शहरात रविवार, 27 रोजी ‘सायक्लोथॉन 2022’ चे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील आरपीडी रोडवरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पटांगण (डी.एस.ग्राऊंड) पासून पहाटे सहा वाजता पाच, दहा व 20 किलोमीटर अंतरासाठी रॅलीला सुरुवात होणार असून नोंदणीसाठी संपर्काचे आवाहन करण्यात आले आहे .
स्पर्धेसाठी लकी ड्रॉ काढण्यात येणार असून त्याद्वारे सायकल आणि इतर अनेक भेटवस्तू जिंकण्याची संधी देखील उपलब्ध असणार आहे.
इच्छुकांनी स्पर्धेतील सहभागासाठी प्रभाकर हॉल, कल्पना रसवंती, छत्रपती शिवाजी महाराज कॉम्प्लेक्स, अष्टभुजा डेअरी, अष्टभुजा मंदिराजवळ, रूपलता मेडिकल, पांडुरंग टॉकीजजवळ तसेच व्यंकटेश स्टील, बालाजी मंदिराजवळ येथे संपर्क साधण्याचे कळवण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी प्रोजेक्ट चेअरमन डॉ.प्रवीण वारके (9860604295), को.चेअरमन महेश चौधरी (8806122111), अध्यक्ष हरविंदर ठेठी (9325671888), सचिव आशिष अग्रवाल (9373287962) यांच्याशी संपर्क साधावा



