जनजागृतीपर विधायक उपक्रम घेवून शिवजयंती साजरी करा -डिवायएसपी सोमनाथ वाघचौरे :

जनजागृतीपर विधायक उपक्रम घेवून शिवजयंती साजरी करा – उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे :
भुसावळ – छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त आरोग्यविषयक उपक्रम , प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता यांबाबत जनजागृतीपर विधायक उपक्रम घेवून शिवजयंती साजरी करा असे आवाहन उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांनी करीत शिवजयंतीच्या निमित्ताने शासनाने निर्गमीत केलेल्या मार्गदर्शक सुचना यावेळी दिल्या.

 उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे कार्यालयात बुधवार दिनांक १६ रोजी  डिवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांच्या अध्यक्षतेखाली  आगामी १९ रोजी साजरा होणा-या शिवजयंती निमित्त बैठक आयोजित करण्यात आली होती. 

यावेळी मार्गदर्शन करतांना डिवायएसपी वाघचौरे म्हणाले की , दरवर्षी “छत्रपती शिवाजी महाराज जयंती” साजरी करतांना संपूर्ण महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.परंतु यावर्षी सांस्कृतिक कार्यक्रमांचे मोठया प्रमाणावर आयोजित करु नये, त्याऐवजी सदर कार्यक्रमाचे केबल नेटवर्क अथवा ऑनलाईन प्रक्षेपण उपलब्ध करुन देण्यबाबत व्यवस्था करण्यात यावी.तसेच
प्रभात फेरी , बाईक रॅली अथवा मिरवणुका काढण्यात येवू नयेत, त्याऐवजी छत्रपती शिवाजी
महाराजांच्या पुतळयाला प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्याचा कार्यक्रम आयोजित करुन त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सींगचे पालन करुन छत्रपती “शिवाजी महाराज जयंती” साजरी करावी. यानिमित्त आरोग्यविषयक उपक्रम / शिबिरे (उदा.रक्तदान) आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे आणि त्याव्दारे कोरोना, मलेरिया, डेग्यू इत्यादी आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता यांबाबत जनजागृती करण्यात यावी. आरोग्य
विषयक उपक्रमांचे आयोजन करतांना त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सींग तसेच स्वच्छतेचे नियम
(मास्क, सॅनिटायझर इत्यादी) पाळण्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे. छत्रपती शिवाजी महाराज जयंती जागेवर साजरी करतांना कमीत कमी लोकांचे उपस्थित
करण्यात यावी.उत्सव साजरा करतांना कोणीही डि.जे.सारखा वाद्याचा वापर करण्यात येवु
नये. शिवजयंती उत्सवाच्या पार्श्वभुमीवर कोणतेही आक्षेपार्ह किंवा अनाधिकृत बॅनर लावू नये, विनापरवानागी बॅनर आढळून आल्यास त्यांचे योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल. यासह कोविड – 19 च्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता महाराष्ट्र शासन महसूल व वन आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाचे परिपत्रक क्र. DMU/2020-CR-92/ DisM-1,
दि.08.01.2020 तसेच DMU/2020-CR-92/ DiSM-1, दि.31.01.2020 अंतर्गत दिलेल्या सुचनांचे काटेकोर पालन करण्यात येणार असल्याचेही सांगीतले .
सदर बैठकीस उपविभागातील प्रभारी अधिकारी पो.निरी. गजानन पडघन, राहुल गायकवाड, सपोनि.प्रकाश वानखेडे, सपोनि.स्वप्नील नाईक, सपोनि.रुपाली चव्हाण उपस्थित होते .
यावेळी बैठकीत हजर असलेल्या सर्व व्यक्तींनी उपरोक्त सुचनांचे अधिन राहून शिवजयंती उत्सव आनंदात साजरा करण्याचे मान्य केले आहे. तसेच यावेळी उपस्थितांनीं मांडलेल्या सुचना व म्हणने ऐकून प्रश्नांचे निरसन करून त्यांना योग्य त्या सुचना देण्यात आल्यात.
या बैठकीस उपविभागातील शिवाजी महाराज पुतळा समिती सदस्य, सर्व शिवजयंती उत्सवाचे मंडळाचे सदस्य, यापूर्वी काढण्यात येणा-या मिरवणुकांचे आयोजक, प्रतिमा पुजन करणारे पदाधिकारी तसेच विभागातील पोलीस पाटील सदर बैठकीस उपस्थित होते.