भुसावळ – येथील रेल्वे लोहमार्ग पोलिसांनेे रविवार १३ रोजी कामगिरी करीत गांधीधाम एक्सप्रेस मधून दोन लाख रुपये किमतीचा 20 किलो ओला गांजासह दोघे बालकाना ताब्यात घेतले आहे . तर यातील एक आरोपी फरार झाला आहे .

ट्रेन नं.22974 अप गांधीधाम एक्सप्रेस फलाट क्रमांक १ वर आली असता दोन विधी संघर्षित बालक व
एक सुकलाल नावाचा व्यक्ती राहणार होशंगाबाद हे नागपुर ते भुसावळ गांधीधाम एक्सप्रेस गाडीने आले ते उतरुन जात असतांना
दोन बालकांना संशयावरुन रेल्वे सुरक्षा बल पोलिसांनी पकडले मात्र यातील सुकलाल हा पळुन गेला.पकडले गेलेल्या दोन्ही बालकाकडुन 20 किलो ओला गांजा किमत अंदाजे.2,00,000/- रु.चा माल मिळुन आल्याने रेल्वे पोलीस ठाणे भुसावळ येथे गुन्हा दाखल
करण्याची कारवाही करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक विजय घेरडे , रेल्वे सुरक्षा बल निरीक्षक राधाकिसन मिना , सीआयबी निरीक्षक एस व्ही थोरात ,
पोलिस उपनिरीक्षक साळुखे, सहाय्यक फौजदार मधुकर न्हावकर ,भरत सिरसाट,सुनील इंगळे ,विकास पाटील पोलिस कर्मचारी अजीत तडवी,धनराज
लुले दिवानसिंग राजपुत , अनिल वसावे पो ना राजेंद्र गवई सचिन गुप्ता आरपीएफ उप निरीक्षक तिवारी , सीआयबी सहाय्यक फौजदार महाजन
यांनी केली.
.


