शिवसेनेतर्फे निबंध आणि गोष्ट सांगा स्पर्धा- १४ फेब्रुवारी पर्यंत अंतिम मुदत :


भुसावळ- शिवसेना तालुका संघटक प्रा. धीरज पाटील तसेच व्हिजन अकॅडेमीच्या संचालिका प्रा. सीमा पाटील यांच्यातर्फे शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन आणि माजी नगरसेवक दीपक धांडे यांच्या वाढदिवसानिमित्त १० ते १५ वर्ष वयोगटातील विध्यार्थ्यांसाठी “ऑनलाईन शिक्षण पद्धती – संधी व समस्या” या विषयावर निबंध स्पर्धा तसेच इयत्ता पहिले ते चौथीच्या विध्यार्थ्यांसाठी “गोष्ट सांगा स्पर्धा” आयोजित करण्यात आली आहे. विद्यार्थी त्यांच्या सोयीप्रमाणे कोणतीही ३ ते ४ मिनिटांची गोष्ट निवडू शकतात. दोनही स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम पारितोषिक १००१ रुपये व प्रमाणपत्र, व्दितीय पारितोषिक ५०१ रुपये व प्रमाणपत्र आणि तृतीय पारितोषिक ३०१ रुपये व प्रमाणपत्र दिनांक १५ फेब्रुवारी रोजी वितरित करण्यात येणार आहे. सहभागी सर्व विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल. विद्यार्थ्यांनी लिखित निबंध पीडीएफ करून व रेकॉर्ड केलेला गोष्टीचा व्हिडीओ १४ फेब्रुवारी पर्यंत ७७०९०४४९०४ या क्रमांकावर पाठवावा.
गोष्ट सांगण्याच्या निमित्ताने घरा घरातून बालक – पालक संवाद वृद्धिंगत व्हावा, गोष्टींची परंपरा कायम राहावी, तंत्रज्ञानाचा वापर करून ऑनलाईन शिक्षण मुलांना काय देऊन गेले? ह्याची खरी माहिती निबंधाच्या स्वरूपात विध्यार्थ्यांकडूनच मिळवण्याचा हेतू या स्पर्धेचा आहे. अधिकाधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविण्याचे आवाहन शिवसेना तालुका संघटक प्रा. धीरज पाटील यांनी केले आहे.