भुसावळात उद्या शिवसेनेची महत्वपूर्ण बैठक :


भुसावळ – शिवसेना उपनेते व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे हस्ते दिनांक १२ फेब्रुवारी २०२२ रोजी भुसावळ येथे विविध विकास कामांचे उद्घाटन करण्याचे योजले आहे. तसेच भुसावळ विधानसभा संपर्कप्रमुख सुरेश राणे यांनी संघटना बांधणीसाठी दिलेल्या निर्देशाप्रमाणे शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हा संघटक विलास मुळे, उपजिल्हाप्रमुख प्रा.उत्तम सुरवाडे, विधानसभा क्षेत्र प्रमुख संतोष सोनवणे, तालुका संघटक प्रा.धीरज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेची शुक्रवार, दिनांक ११ फेब्रुवारी २०२२ रोजी संध्याकाळी ४ वाजता शासकीय विश्राम गृह, भुसावळ येथे महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीस भुसावळ शिवसेना तसेच सर्व अंगीकृत संघटनेच्या आजी माजी पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व शिवसैनिकांनी बैठकीस उपस्थित राहावे असे आवाहन शहरप्रमुख बबलू बऱ्हाटे यांनी केले आहे.