वरणगाव – गाणकोकीळा भारतरत्न लता मंगेशकर यांचे निधन झाल्याने वरणगाव शहर शिवसेनेतर्फे त्यांना भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
शासकीय विश्राम गृहात शिवसेनेतर्फे स्वरसम्रादणी भारतरत्न गाणंकोकिळा लता मंगेशकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी भुसावळ तालुका संपर्कप्रमुख सुरेश राणे यांनी लता दीदीबद्दल थोडक्यात माहिती सांगितली.
यावेळी मुस्लिम अल्प संख्याक समाजाचे नेते हिप्पीशेठ, शिवसेना शहरप्रमुख संतोष माळी, निलेश ठाकूर, उपशहर प्रमुख राम शेटे, अशोक शर्मा, माजी उप शहर प्रमुख सुनील भोई, नितीन देशमुख, युवासेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत शर्मा, शिवा भोई, शहर संघटक पंकज चौधरी, शहर समन्वयक अबुबकर खान, वैभव लोखंडे, भुषण चौधरी, गोविंदा चौधरी, सागर वंजारी, राहुल वंजारी यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.




