महिला पर्यावरण सखी मंच तर्फे जिल्ह्य़ातील पहिली सीड बँक भुसावळला सुरु : कौतुकास्पद उपक्रम :


भुसावळ – वृक्ष लागवड होऊन निसर्गात होणारा -हास थांबणे हाच उद्देश ठेवून महिला पर्यावरण सखी मंचने प्लांट बँक नंतर आता सीड बँक सुरू केली आहे.
प्रत्येक वर्षी शहरातील तापमान वाढतच जात आहे. शहराचा आणि परिसराचा विकास होत असल्यामुळे तोडण्यात आलेल्या वृक्षांचा परिणाम हा उन्हाळ्यात जाणवत आहे. हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून हिरवेगार भुसावळ हा संकल्प आमच्या मंडळाच्या महिलांनी केला आहे. त्यानुसार वृक्ष प्रेमींना वृक्ष आणि बिया या मोफत दिला जाणार आहे, प्रत्येक भुसावळकरांनी एक वृक्ष जरी लावला आणि त्याचे वर्षभर संवर्धन केले तरी येत्या दहा वर्षात शहर व परिसर हिरवेगार होण्यास मदत होणार आहे, हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून सीड बँक सुरू केली आहे. असे महिला पर्यावरण सखी मंचच्या अध्यक्षा शालीनी वाडेकर यांनी उद्घाटन प्रसंगी सांगितले.
या प्रसंगी डाॅ. वंदना वाघचौरे उद्घाटक म्हणून हजर होत्या त्यांनी सिड बँकेसाठी शुभेच्छा दिल्या व भुसावळ हिरवेगार करण्यात साठी मोलाची मदत होईल असे सांगितले. प्रमुख पाहुणे म्हणून रजनी सावकारे उपस्थित होत्या त्यांनी सिड बँकेसाठी शुभेच्छा देऊन या साठी कोणतेही सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. कार्यकारी अध्यक्षा आरती चौधरी यांनी आम्ही ज्या उत्साहाने प्लांट बँक चालवतोय त्याच उत्साहाने आम्ही सीड बँक यशस्वी करून दाखवू असे सांगितले.
या नंतर पर्यावरणच्या महिलांनी हळदीकुंकू करून पक्षासाठी ठेवण्यात येणाऱ्या पाण्याचे भांडे व रोप असे वाण देण्यात आले.
या अभिनव कल्पनेचे सगळ्यांनी कौतुक केले
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रियांका चौधरी यांनी केले. या प्रसंगी विद्या पाटील, रिता नाईक, जया इंगळे, रेखा निकम, अलका भटकर, मनिषा नीकम, वैशाली निकुंभ, आरती देशपांडे, प्रियांका चौधरी, स्वाती भोळे, भाग्यश्री भंगाळे, सारिका फलक, शीतल अरोरा, अनिता आंबेकर, सुनंदा औंधकर, , चव्हाण भारती श्रद्धा महाले हे मेंबर उपस्थित होते.