भुसावळ डीआरएम कार्यालयाच्या प्रवेशद्वारवर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूतळा बसवा- रेल कामगार सेनेची मागणी ; महाप्रबंधक यांना दिले निवेदन :


भुसावळ- . येथे रेल्वेचे महाप्रबंधक अनिल कुमार लाहोटी यांचा निरीक्षण दौरा नुकताच झाला.यावेळेस कोविड चे नियम पाळून रेल कामगार सेनेच्या शिष्टमंडळाने लाहोटी यांची भेट घेवून भगवा सत्कार केला .या केळी ज्वलंत मागण्यांचे निवेदन देवून सखोल चर्चा केली.जी एम कार्यालय मुंबईच्या धर्तीवर आधारित छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूतळा भुसावळ डीआरएम कार्यालयाच्या प्रवेशद्वारवर बसविणे तसेच ,रेल्वे दवाखान्यास छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देणे,भुसावळ विभागातील सर्व रेल्वे स्थानक व रेल्वे आरक्षण कार्यालय येथील बोर्ड मराठीत लिहिणे,रेल्वे दवाखान्यात स्पेशालिस्ट डॉक्टरची भर्ती व उच्च श्रेणीची औषधे उपलब्ध करून देणे,ट्रेकमन यांच्यावर होणारा अन्याय दूर करणे,त्यांच्या ऑर्डर निघाल्यावर त्यांना रीलीव न करणे,त्यांचे बदली व विनंती अर्ज फॉरवर्ड न करणे, एलडीसीई व जेडीसीई सर्वान साठी खुली करून परीक्षा लगातार् घेणे,एमओएच वर्कशॉप आहे की रनींग शेड , घोषित करणे,पीओएच वर्कशॉप साठी स्पेशल अम्ब्युलेंस व्यवस्था करणे,लोको पायलट यांना वेळेवर पूर्ण विश्राम देणे,डिवीजन मधील रिक्त जागा त्वरित भरणे, लिपीकच्या रिक्त जागा ताबडतोब भरणे,तिकीट तपासणीस (tc) विश्रामालय त्वरित दुरुस्त करावे इतर मुद्द्यांवर चर्चा झाली. यावेळी भुसावळ मंडळ अध्यक्ष ललितकुमार मुथा,खजिनदार योगेश माळी,राजेश लखोटे,राकेश पाठक,विनोद वाघे,प्रकाश करसाळे,महेंद्र सोनवने,विजय तायड़े,अरविंद थोरात,कमलाकर बाणाईत,अब्दुल अजीज,संजय जगनाथ चौधरी हे उपस्थित होते
—////–/
फोटो – भुसावळ येथिल डीआरएम कार्यालयात महाप्रबंधक अनिल कुमार लाहोटी यांना विविध मागणीचे निवेदन देताना रेल कामगार सेनेचे ललित कुमार मुथा व योगेश माळी.