भुसावळ – उपविभाग हद्दीत
शुक्रवार रोजी दि.21 रोजी 10. ते दि. 22 रोजी 4 दरम्यान कोम्बींग ऑपरेशन राबविले. सदरच्या कोम्बिंग ऑपरेशन मध्ये पोलीस स्टेशन रेकॉर्डवरील पाहिजे फरार आरोपी, तडीपार आरोपी, अटक वारंट मधील आरोपी, अवैध धंद्यावर वरील रेड कारवाई आधी बाबींवर कारवाई करण्यात आली. त्यात खालीलप्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.

पाहिजे आरोपी अटक – उपविभागातील पोलीस स्टेशनला पाहिजे असणारे आरोपींपैकी
एकूण 32 पाहिजे आरोपी चेक केले. त्यापैकी 3 मिळून आले
गु.र.क्र. 488/21, भादंवि कलम 326, 504, 506, 34
1) अनिस खान सिकंदर खान, वय 45
2) सज्जाद खान अनिस खान, व़य 19
भुसावळ शहर पो स्टे पाहिजे आरोपी
3) विष्णु परशुराम पथरोड
यांना अटक करण्यात आली आहे.
अटक वॉरंट बजावणी – न्यायालयाकडून विविध आरोपींविरुद्ध काढण्यात आलेल्या अटक वारंट मधील आरोपी चेक करण्यात आले. त्यापैकी 9 आरोपींना अटक वारंट ची बजावणी करण्यात आली.
BW बजावणी – 14
न्यायालयात हजर न राहणाऱ्या आरोपींविरुद्ध न्यायालयाकडून बेलेबल वारंट काढण्यात येते. अश्या च 14 आरोपींना रात्रीच्या कोम्बिंग ऑपरेशन मध्ये अवेलेबल वारंट ची बजावणी केली.
तडीपार चेक
10 हद्दपार चेक केले पैकी एक मिळून आला. त्यापैकी
शाकीर ऊर्फ गोलु शेख रशिद हा हद्दपार असतानादेखील शहरामध्ये मिळून आला. कोळी त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 142 खाली याचेवर गुन्हा दाखल केला.
BP act 122 – 03
त्याशिवाय रात्रीच्या वेळी गुन्हा करण्याच्या उद्देशाने संशयित रित्या मिळून आलेल्या खालील आरोपींविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 122 खाली गुन्हा दाखल करण्यात आला. सदरचे आरोपीचे कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान विविध भागांमध्ये रात्रीच्यावेळी संशयित रित्या फिरताना मिळून आले.सदर आरोपींविरुद्ध या गुन्ह्याच्या तपासामध्ये ते रात्रीच्या वेळी संशयित पणे नेमके कशासाठी फिरत होते याबाबत सविस्तर तपास करण्यात येणार आहे
1) मजहर उद्दीन एजाज उद्दीन शेख , वय 29
2) जुबेर शहा कय्युब शहा, वय 19
3) शाम तायडे, वय 22
महाराष्ट्र दारुबंदी कायदा 05गुन्हे दाखल केले.
हिस्ट्रीशिटर पोलीस स्टेशन रेकॉर्डवर पूर्वीचे गुणी असणारे विविध हिस्टरी सिटर आहेत. त्यापैकी
14 चेक केले पैकी 11 मिळून आले. जे गुन्हेगार घरी मिळून आले नाही त्यांच्या बाबतीत ते नेमके कोठे होते याबाबत तपास करण्यात येत आहे…
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक प्रवीण मुंडे पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी , पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड बाजारपेठ पोलीस स्टेशन, पडघन भुसावळ शहर पोलीस स्टेशन,श्री मोरे नशिराबाद पोलीस स्टेशन,सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश भोये, पोलीस उपनिरीक्षक श्री महाजन,पोलीस उपनिरीक्षक साळुंखे,सपोनी पाथरवट व पोलीस स्टेशन येथील स्टाफ यांनी केली.


