भुसावळ उपविभागात रात्री राबविले कोम्बिंग ऑपरेशन :


भुसावळ – भुसावळ उपविभाग हद्दीत पोलिसांनी काल दि.२१ रोजी रात्री १० वा. ते २२ रोजी पहाटे ४ वाजे दरम्यान शहरात कोम्बींग ऑपरेशन राबविले. यात पोलीस स्टेशन रेकॉर्डवरील पाहिजे फरार आरोपी, तडीपार आरोपी, अटक वारंट मधील आरोपी, अवैध धंद्यावरील कारवाई आदी बाबींवर कारवाई करण्यात आली.
पोलिसांना हवे असलेल्या ३२ पैकी ३ आरोपींना ताब्यात घेण्यात आले. यात अनिस खान सिकंदर खान (वय ४५), सज्जाद खान अनिस खान (वय १९) तसेच शहर पोलिस ठाणे हद्दीतील विष्णु परशुराम पथरोड यांचा समावेश आहे.
न्यायालयाकडून विविध आरोपींविरुद्ध काढण्यात आलेल्या अटक वारंटमधील आरोपींची तपासणी करण्यात आले. त्यापैकी ९ आरोपींना अटक वारंट बजावण्यात आला. न्यायालयात हजर न राहणार्‍या आरोपींविरुद्ध न्यायालयाकडून बेलेबल वारंट काढण्यात येते. अश्या १४ आरोपींना रात्रीच्या कोम्बिंग ऑपरेशन मध्ये अवेलेबल वारंटची बजावणी केली.
१० हद्दपार आरोपींची तपासणी केली. त्यापैकी शाकीर ऊर्फ गोलु शेख रशिद हा हद्दपार असतानादेखील शहरामध्ये मिळून आला. त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १४२ खाली याचेवर गुन्हा दाखल केला.
त्याशिवाय रात्रीच्या वेळी गुन्हा करण्याच्या उद्देशाने संशयित रित्या मिळून आलेल्या खालील आरोपींविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १२२ खाली गुन्हा दाखल करण्यात आला. सदरचे आरोपीचे कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान विविध भागांमध्ये रात्रीच्यावेळी संशयित रित्या फिरताना मिळून आले. सदर आरोपींविरुद्ध या गुन्ह्याच्या तपासामध्ये ते रात्रीच्या वेळी संशयित पणे नेमके कशासाठी फिरत होते याबाबत मजहर उद्दीन एजाज उद्दीन शेख (वय २९), जुबेर शहा कय्युब शहा (वय १९), शाम तायडे (वय २२) यांचा सविस्तर तपास करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र दारुबंदी कायद्यानुसार ५ गुन्हे दाखल करण्यात आले.पोलीस स्टेशन रेकॉर्डवर पूर्वीचे गुणी असणारे विविध हिस्टरीसिटर आहेत. त्यापैकी १४ जणांची तापसणी केली त्यापैकी ११ मिळून आले. जे गुन्हेगार घरी मिळून आले नाही. त्यांच्या बाबतीत ते नेमके कोठे होते याबाबत तपास करण्यात येत आहे.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक प्रवीण मुंडे, पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक श्री. गायकवाड, शहरचे पो.नि. श्री. पडघन, नशिवाबादचे एपीआय श्री. मोरे, सपोनि हरीश भोये, पोउनि श्री. महाजन, पोउनि साळुंखे, पीएसआय पाथरवट व पोलीस स्टेशनचे कर्मचार्‍यांनी केली.