बोदवड नगरपंचायतवर शिवसेना सत्ता आल्याने वरणगावत जल्लोष : बस स्टँड चौकात फटाक्यांची आतिषबाजी :

वरणगाव – बोदवड नगरपंचायत निवडणुकीत शिवसेनेची एक हाती सत्ता आल्याने बोदवड नगरपंचायतवर भगवा फडकल्याने वरणगाव येथे शिवसेनेच्या वतीने जिल्हाप्रमुख समाधान महाजन सर यांच्या नेतृत्वात बस स्टँड चौकात फटाक्यांची आतिषबाजी करून कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. बोदवड नगरपंचायत निवडणुकीचा निकाल आज 19 बुधवार रोजी होता. आजच्या या निवडणुकीत नऊ जागावंर शिवसेनेला बोदवडकरांनी एक हाती सत्ता देऊ शिवसेनेचा भगवा फडकविला. बोदवड नगरपंचायतवर आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावर विश्वास ठेऊन नागरिकांनी शिवसेनेची सत्ता आल्याने वरणगाव शिवसेनेच्यावतीने बस स्टँड चौकात सायंकाळी फटाक्यांची आतिषबाजी करून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी ‘बोदवड अभी झाकी है..वरणगाव अभी बाकी है’ जय भवानी जय शिवाजी, ‘चंदू भाऊ तुम आगे बढो’ अशा विविध शिवसेनेच्या जोरदार घोषणा देऊन वातावरण भगवेमय झाले.
याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन सर, जिल्हा संघटक विलास मुळे, उपतालुकाप्रमुख सुभाष चौधरी, अल्पसंख्यांक नेते हिप्पी शेठ, संतोष माळी, युवा जिल्हाप्रमुख चंद्रकांत शर्मा, सुरेश चौधरी, साई चौधरी, उपशहर प्रमुख सुनील भोई, उमाकांत झांबरे, सुखदेव धनगर, संजू भोई, किशोर कोळी, प्रकाश कोळी, बुरा धरणे, काहूरखेडा सरपंच विनोद पाटील, फुलगावचे निळु चौधरी, विलास पाटील, पी ए पाटील, कन्ना महाजन, कृष्णा पुजारी, नितीन पाटील, किरण माळी, संकेत माळी, पवन चौधरी, रितेश माळी, पवन माळी, राहुल बंजारी, अतुल पाटील, अमर सोनार, आबा सोनार, दिपक शेडके, सागर वंजारी, गिरीश माळीयांच्यासह कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.