कोरोनाचा कहर : भुसावळसह जळगाव जिल्ह्यात आढळले तब्बल रुग्ण 409 –

जळगाव : जळगाव जिल्ह्यात कोरोना सुसाट वेगाने पसरत आहे. जळगावसह भुसावळ रुग्णांचे प्रमाण अधिक असल्याने ही शहरे कोरोनासाठी हॉटस्पॉट ठरत आहेत. जिल्ह्यात मंगळवार, 18 जानेवारी रोजी एकाच दिवसात तब्बल 409 रुग्ण आढळल्याने जिल्हा प्रशासनात खळबळ उडाली आहे.
भुसावळसह जळगावात सर्वाधिक रुग्ण वाढत असल्याने प्रशासनाने गांभीर्याने दखल घेण्याची गरज आहे.
आतापर्यंत 2580 रुग्णांचा मृत्यू
जिल्ह्यात आतापर्यंत दोन हजार 580 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार, जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख 45 हजार 785 नागरीकांना कोरोनाची लागण झाली असून त्यातील एक लाख 40 हजार 726 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली. मंगळवारी 180 रुग्णांनी कोरोनावर मात केली.

या शहरात आढळले नव्याने बाधीत
जळगाव शहर 159
जळगाव ग्रामीण 18
भुसावळ 106
अमळनेर 04
चोपडा 43
पाचोरा 09
भडगाव 13
धरणगाव 06
यावल 01
एरंडोल 02
जामनेर 05
रावेर 04
पारोळा 09
चाळीसगाव 07
मुक्ताईनगर 20
बोदवड 00
अन्य जिल्हा 02

भुसावळातील कोरोनावाढीचे हे समोर आले कारण
रेल्वेमुळे देशभरातील प्रवाशांचा भुसावळ शहरासोबत थेट संपर्क येतो. त्यामुळे शहरात कोरोनाच्या रुग्णसंख्येने मुसंडी मारली आहे. तिसर्‍या लाटेतील पहिल्या रुग्णाला रेल्वेची ट्रॅव्हल हिस्ट्री होती. सध्याच्या अ‍ॅक्टिव्ह रुग्णांपैकी 50 ते 52 टक्के अ‍ॅक्टिव्ह रुग्णांना ट्रॅव्हल्स हिस्ट्री आहे. त्यापैकी काही रुग्ण रेल्वे संबधीत विभागातील बाधितांच्या संपर्कात आले आहेत. शहरातील दाट लोकवस्ती, नियमांकडे दुर्लक्ष यामुळेही रुग्णसंख्या वाढत आहे.