महिला मंडळातर्फे गीतापाठ व शरद महाराज यांचे प्रवचन

भुसावळ – जामनेर रोडलगत गजानन महाराज मंदिरासमोरील रामानंद नगर नगरात महिला मंडळातर्फे गीतापाठ व शरद महाराज गोजोरेकर यांच्या प्रवचनाचा कार्यक्रम पार पडला.
द्वारकाबाई रामचंद्र सपकाळे यांच्या द्वितीय पुण्यस्मरणार्थ गीतापाठ झाला. यात हनुमान नगर गीतापाठ महिला मंडळ, रेल दुनिया गीतापाठ महिला मंडळ, मुक्ताई नगर गीतापाठ महिला मंडळ, सोमनाथ नगर गीतापाठ महिला मंडळ, चक्रधर नगर गीतापाठ महिला मंडळ, हिरा नगर गीतापाठ महिला भजनी मंडळ यांच्यासह दीपनगर, साकरी, फेकरी, खडका व यावल तालुक्यातील न्हावी येथील गीतापाठ महिला मंडळ सहभागी झाले होते. त्यानंतर हभप शरद महाराज गोजोरेकर यांचे प्रवचन झाले. त्यांनी आपल्या प्रवचनात गीतापाठाचे महत्त्व सांगून अध्यात्मात रममाण होण्याचे आवाहन केले. यावेळी श्रीमद् भागवत कथा प्रवक्ते कीर्तनकार हभप लक्ष्मण महाराज चिखलीकर व गीतादास हभप चंद्रकांत महाराज साकरीकर उपस्थित होते. सायंकाळी हरिपाठ व रात्री ८ वाजता भजनी मंडळातर्फे भजनाचा कार्यक्रम पार पडला. यशस्वीतेसाठी गीतादास हभप चंद्रकांत महाराज साकरीकर, सुभद्राबाई सपकाळे, किर्ती सपकाळे, प्रणव व कृष्णा सपकाळे आदींनी परिश्रम घेतले.