वरणगाव – शहराच्या बस स्थानक चौकातून व्हीडॉल कंपणीच्या वितरण अधिकाऱ्याची महत्वाचे साहीत्य असलेली बॅग हरवली होती त्यांची तक्रार पोलीस स्टेशनला दिल्या नंतर पोलीसानी तपास चक्र फिरवून अवघ्या अर्ध्या तासात बॅग त्याला परत मिळून दिल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता
या बाबत वृत असे व्हीडॉल ऑईल कंपणीचे अशोककुमार चंद्रपाल मिश्रा रा भुसावळ हे कामा निमीत वरणगावला सकाळी दहा वाजेच्या सुमार मारोती गाडीने आले होते गाडी रोड वर
उभी करून गॅरेज मालकाशी बोलण्या साठी उतरले बोलणे झाल्या नंतर गाडीत बसले त्यांनी मागील शिटवर ठेवलेली बॅग कडे नजर टाकली तर काय ! बॅग गाडीतून गायब झाली बॅगीत महत्वाचे कागद पत्र बॅकेचे चेक एक लॉपटॉप अशा वस्तू असल्याने ते बेचैन होऊन बॅग शोधण्याचा प्रयत्न केला मात्र कुठेच सुगावा लागताच नसल्याने वरणगाव पोलीस स्टेशन गाठून उप पोलीस निरिक्षक अशिष आडसुड, सह पो निरिक्षक निलेश साळुके , परशुराम दळवी यांच्या कडे आपली फिर्याद माडताच पोलीसानी आपले तपास चक्र फिरवीत आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात करीत पो कॉ राहुल येवले , पो कॉ अतूल बोदडे , पो कॉ प्रशांत ठाकुर , व इस्माल शेख यांच्या सह मुक्ताईनगरच्या दिशेने आरोपीचा शोध घेण्यासाठी रवाना झाले मात्र कदाचीत पोलीस आपल्या मागावर असल्याचे चोरट्या माहीत असल्याने की काय ? आयुध निर्मार्णी कडे जाणाऱ्या रस्त्यावर नवीन चौपदरी महामार्गच्या पुला खाली ती बॅग फेकून देऊन तेथून पळ काढला त्याच मार्गावरून जाणाऱ्या एका व्यक्तीने ती बॅग उघडली त्यातील असलेल्या वस्तूच्या आधारे त्यांनी वरणगाव पोलीस स्टेशनला संपर्क साधुन त्या बॅग विषयी माहिती देताच त्या ठिकाणी पोहचून बॅग ताब्यात घेत त्या बॅगेचे मालकास पोलीस स्टेशनला बोलावून ती त्याला त्यांच्याकडे करताच त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसाडून वाहत होता शेवटी त्यांनी वरणगाव पोलीस स्टेशन अधिकारी व कर्मचारी यांचे आभार मानले



