भुसावळ – मकर संक्रातीला महिलेचा हरविलेला मोबाईल गौसेवकांनी शोधून परत करून प्रामाणिकपणाचा व सहकार्याचा प्रत्यय येथे घडविला .
संक्राती दिनी सौ शोभा माळी ताईंचा हरवलेला महागडा मोबाईल त्यांच्या घरी जाऊन देऊन खरी संक्रात घडवली.
सौ शोभा माळी राहणार शिरपुर कन्हाळा येथील रहिवाशी असुन सकाळी भुसावळ येथे बाजारा साठी निघाल्या ब्राम्हण संघा जवळ पायी चालतांना नजर चुकिने त्यांचा मोबाईल खाली पडला असावा कारण बरेच अंतर पुढे गेल्यावर ही बाब त्यांच्या लक्षात आली
दरम्यान त्याचवेळेस मी देव दर्शनासाठी या रस्त्याने जात असतांना वाटेत मित्राना शुभेच्छा देणासाठी थांबलो तेथे शोभाताई अतंत्य दुखी अवस्थेत दिसल्या मी विचारणा केली असता त्या बोलु शकत नव्हत्या फार घाबरल्या होत्या तेथील रिक्षा चालकांनी माहीती दिली कि मोबाईल हरवला आहे पाणी पुरीचे फुगे विक्री करणाऱ्या माणसाला सापडला असे सांगितले मी त्या ताईंना धीर देत संध्याकाळ पर्यंत मोबाईल मिळेल मग तपास सुरु केला त्या मध्ये संस्कार साडी सेंटरचे सी सी कॅमेरा मधुन बघितले असता त्या पाणी पुरी विक्री करणारा संजय चौहान भुसावळ या माणसाचा शोध घेतला शिरपुर येथील मुंकुदा महाजन यांच्याआई सौ शोभा माळी ताईंच्या घरी जाऊन त्यांना त्यांचा महागडा मोबाईल संजय चौहानच्या हाताने परत करत आजही माणुसकी जिंवत असल्याचा प्रत्यय दिला ताईंनी व त्यांचा परिवाराने गोसेवा परिवाराचे आभार मानुन धन्यवाद दिले व आयुष्यात आपल्या सर्वाना कधी विसरणार नाही असा आशिॅवाद रुपी ग्वाही दिली मोबाईल सापडण्यासाठी गोसेवक रोहित महाले अभिलाष ठाकुर शेखर पाटील चेतन पवार सर्प मित्र किरण पाटील अनिकेत साळी रिक्षा चालक अरुण पाटील संस्कार साडी व फुल विक्रेते बोंडे काका याचे सहकार्य लाभले



