भुसावळात सिंधी कॉलनी भागात हर हर महादेव दुकानात नॉयलॉन मांजाची विक्री : विक्रेत्यास अटक : एलसीबीची कारवाई :

भुसावळ – शासनाने नायलॉन मांजा विक्रीवर प्रतिबंध केला असून देखील भुसावळात सिंधी कॉलनी भागात हर हर महादेव दुकानात नॉयलॉन मांजाची विक्री करत असल्याची गुप्त माहिती जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किरणकुमार बकाले मिळाल्याने माहीती वरुन नेमणूक केलेले पथक घटनास्थळी रवाना करून खात्री केली असता नॉयलॉन मांजाची विक्री करतांना मिळून आल्याने विक्रेत्यास नायलॉन मांजा सह ताब्यात घेण्यात आले.
,शासनाने नायलॉन मांजा विक्री करण्यास प्रतिबंधक केल्यानंतर ही आज दि.14/01/ 2022 रोजी भुसावळ शहरात सिंधी कॉलनी भागात हर हर महादेव दुकानातील उमेश लोकचंद छाबडिया नावाचा इसम हा नायलॉन मांजा हा शासनाने विक्री करण्यास प्रतिबंधक केल्याचे माहिती असतांना सुद्धा तो विक्री करीत असल्याने पो.नि.किरणकुमार बकाले स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांनी स्थानिक गुन्हे शाखे कडील स.फौ. अशोक महाजन पो.हे.कॉ लक्ष्मण पाटील,पो.ना किशोर राठोड,पो.ना रणजित जाधव,पो.ना श्रीकृष्ण देशमुख,पो.कॉ विनोद पाटील, पो.कॉ ईश्वर पाटील सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा जळगाव अश्यांना लागलीच त्या ठिकाणे पाठवले तेव्हा नेमलेल्या वरील पथकाने त्या ठिकाणी जाऊन त्यास ताब्यात घेतले व त्याला त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव गाव
उमेश लोकचंद छाबडिया वय – 27 रा. सिंधी कॉलनी भुसावळ असे सांगितले.त्याकडे 1600/- रु.कि.चा नायलॉन मांजा ने भरलेल्या 2 चक्रि,200 /- रु. कि.च्या मांजा नसलेल्या खाली 5 चक्री असे एकूण 1.800 /- रू. असे त्याच्या जवळ मिळुन आल्याने आरोपीताची वैदयकीय तपासनी व मुदेमाल पंचनामा करुन पुढील योग्य ती कारवाई साठी भुसावळ बाजार पेठ पो.स्टे च्या ताब्यात दिले.