भुसावळ – साला बादप्रमाणे या वर्षी सुध्दा नगरसेवक किरण कयांच्या तर्फे आज गुरुवार दिनांक १३ जानेवारी रोजी जय मातृभूमी चौकामध्ये जय मातृभूमी दिनदर्शिका २०२२ चे प्रकाशन जेष्ठ नागरीकांच्या हस्ते करण्यात आले .
गेल्या तीन वर्षा पासून मातृभुमि मंडळातर्फे नगरसेवक किरण कोलते नियमितपणे प्रभागातील नागरिकांना मोफत दिनदर्शिका देत आहे तसेच मकर संक्रांतीला सुद्धा सहा वर्षापासून प्रभागातील बालगोपालांना पतंग वाटप करीत असून यंदाही पतंग वाटप होणार असल्याचे यावेळी किरण कोलते यांनी सांगीतले .
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला आपण सामोरे जात असून प्रत्येकाने न घाबरता सामोरे जायचे आहे याकरीता नियम पाळा , काळजी घ्या , गर्दी टाळा, मास्क व सांईटायझर वापरा . लस घेतली नसेल तर अवश्य घ्या असे आवाहन सुद्धा प्रसंगी श्री कोलते यांनी केले .
या दिनदर्शिकेच्या माध्यमातून नागरिकांना अतिशय चांगली व उत्तम माहीती मिळत असते या स्तुत्य उपक्रमाचे प्रभागात कौतुक होत आहे .
यावेळी वसंत चौधरी ,अरुण काळे,जयंत बालाजीवाले,एल पी चौधरी ,अडावतकर ,कुळकर्णी सर ,रावेरकर काका,चौधरी सर ,वानखेडे सर, गोविंद पाटील ,एकनाथ पाटील, नरेन्द्र ठाकूर,दशरथ राणे,पंढरीनाथ बाविस्कर,झोपे दादा,ओकांर नाफडे,बाबुराव ब-हाटे ,दत्तू पाटील,सुभाष वारके,प्रकाश शहा,सुरेश शेठ,सुरेश हिवरकर , आदीं उपस्थित होते . यशस्वितेकरीता जय मातृभूमी मंडळाचे तथा पालिकेचे नगरसेवक किरण कोलते यांचेसह मित्र परिवार व मातृभुमि मंडळ पदाधिकारी सदस्य यांचे विशेष सहकार्य लाभले .



