जळगाव- चोपडा तालुक्यातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. तालुक्यातील आडगाव येथील रहिवासी असलेल्या सहा वर्षीय बालिकेवर, संशयित आरोपी बाबुलाल बारकू भिल याने १० रोजी आडगाव येथे लैंगिक अत्याचार केला. घटनेनंतर संशयित पसार झाला आहे.

१० रोजी दुपारी दीड ते चार वाजेदरम्यान संशयित आरोपी बाबुलाल भिल याने, बालिकेला बोरे खाण्यासाठी माझ्यासोबत चल असे सांगून सोबत नेले. आडगाव येथील नाल्यामध्ये नेऊन हात बांधून संशयिताने तिच्यावर अत्याचार केला. दरम्यान याप्रकरणी चोपडा शहर पोलिसात दिलेल्या फिर्यादी वरुन कलम ३५४, बालकांचे लैंगिक शोषण कलम ८, १२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक घनश्याम तांबे करत आहेत. या घटनेमुळे खळबळ उडाली असून, पोलिस संशयिताचा शोध घेत आहेत.


