चिंतेत वाढ .. जिल्ह्यात नव्याने तब्बल २८५ बाधित रुग्ण –


जळगाव – जळगाव जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. जळगाव शहरासह भुसावळ कोरोना हॉटस्‍पॉट होत आहे. कोरोना रूग्ण संख्येत वाढ झाली असून मागील चोवीस तासात जिल्ह्यात तब्बल २८५ बाधित रूग्ण आढळून आले आहेत. तर १९ जणांनी कोरोनावर मात केलीय. यात सर्वाधिक रुग्ण हे जळगाव शहरात तसेच भुसावळ शहरात आढळून आले आहेत. म्हणून भुसावळ, जळगाव, चाळीसगाव कोरोना हॉटस्पॉट झाले आहे.

जळगाव जिल्ह्यात आज दिवसभरात एकुण २८५ कोरोना रूग्ण आढळून आले आहे. यात जळगाव शहरात ८१, जळगाव ग्रामीण १७, भुसावळ १०४, अमळनेर ५, चोपडा २२, पाचोरा ३, धरणगाव २, यावल १, जामनेर ३, पारोळा ५, चाळीसगाव २९, मुक्ताईनगर १२, आणि इतर जिल्ह्यातील १.