भुसावळ – येथील नाहाटा महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारे आज दिनांक 12 जानेवारी 2022 रोजी “राजमाता जिजाऊ जयंती व राष्ट्रीय युवा दिन” साजरा करण्यात आला.

याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.डॉ. बी. एच. बऱ्हाटे सर उपस्थित होते, तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. राजेंद्र नाडेकर, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी डॉ.विलास महिरे व महिला कार्यक्रमाधिकारी डॉ. ममता बेन पाटील तसेच काही विद्यार्थी उपस्थित होते.
आजच्या कार्यक्रमाला उपप्राचार्य प्रा.डॉ.बी.एच. बऱ्हाटे सर यांनी राजमाता जिजाऊ यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. तसेच स्वामी विवेकानंद यांच्या कार्यामुळे हिंदू संस्कृतीची पताका सातासमुद्रापार लागली. विवेकानंदांच्या अनमोल विचारांनी युवा पिढीला मार्गदर्शन मिळाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख व राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.आर.एस.नाडेकर यांनी केले. तर आभार प्रदर्शन सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा .डॉ .व्ही .एन महिरे यांनी केले. महिला कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ. ममताबेन पाटील व प्रा.भुपेंद्र बाना़ईत सर हे देखील उपस्थित होते.
तसेच कार्यक्रमाला रासेयोचे विविध स्वयंसेवक उपस्थित होते. गायत्री बजाज, आदित्य हिवरे, सागर सोनवणे,अमोल सुरडकर, इत्यादी. यांसारखे विद्यार्थी स्वयंसेवक उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सौ.एम. व्ही. वायकोळे, उपप्राचार्य डॉ.एस. व्ही. पाटील, उपप्राचार्य डॉ.बी. एच. बऱ्हाटे, व डॉ. एन. ई. भंगाळे अनमोल मार्गदर्शन लाभले.


