हिंगोणा येथिल पद्मपाणी प्रोडक्शनच्या थॉट्स ह्या सायलेंट शॉर्ट फिल्मने पटकावले आठ अवॉर्ड ; निर्माता आकाश तायडे यांच्यासह संगित भालेराव आणि कुणाल महाजन यांच्यावर कौतुकाचा वर्षाव :

;
यावल – हिंगोना गावातील पद्मपाणी प्रोडक्शनचे आकाश तायडे, संगित भालेराव आणि कुणाल महाजन या तीन ध्येयवेड्या तरुणांनी बनवलेल्या थॉट्स ह्या सायलेंट शॉर्ट फिल्मने ८ अवॉर्ड पटकावले असून यामध्ये शॉर्ट इंटरनॅशनल फिल्म फेस्टीवलतर्फे बेस्ट सायलेंट फिल्म, आयसीएमएफएफ कडून बेस्ट सायलेंट फिल्म, आयएससीएचा बेस्ट सायलेंट फिल्म, चलचित्र रोलिंग अवॉर्डचा बेस्ट केरॅक्टर, इंडियन फिल्मेकर फिल्म फेस्टीवलचा बेस्ट फिक्शन फिल्म, सिने फेअर फिल्म फेस्टिवलचा बेस्ट शॉर्ट फिल्म ऑफ द इयर, इंडियन शॉर्ट सिनेमा फिल्म फेस्टीवलचा बेस्ट डायरेक्टर आणि वॉलेट फिल्म फेस्टीवलचा बेस्ट सायलेंट शॉर्ट फिल्म यासह अन्य अवार्ड्स मिळाले आहे .
एकपात्री असलेली ही शॉर्ट फिल्म आपले सकारात्मक आणि नकारात्मक विचारांवर आधारित आहे. निर्माता आकाश तायडे , कुणाल महाजन डीओपी व संगित भालेराव यांची ही संकल्पना होती. ८ पारितोषिक पटकावल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.