भुसावळ : महिला आयएएस अधिकारी अहमदाबाद एक्सप्रेसने प्रवास करत असताना ७ रोजी त्यांच्या सामानाची बॅग चोरीस गेली होती. याबाबत गुन्हा दाखल होताच २४ तासात रेल्वे लोहमार्ग पोलिसांनी चोरट्याचा शोध घेऊन लॅपटॉपसह दीड लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

प्रशिक्षणार्थी महिला आयएएस अधिकारी श्रीमती कृती राज (वय ३०) रा. लाल बहादुर शास्त्री अॅकडमी, मसुरी, डेहराडुन उत्तराखंड हया ट्रेनं १९४८४ चे बोगी क्र बी ३ मधून प्रवास करीत असतांना त्यांची सँगबॅग त्यामध्ये लेनोओ कंपनीचा लॅपटॉप व इतर असे एकुण १ लाख ७५ हजाराचा मुददेमाल असलेली सँगबॅग अज्ञात चोरट्याने ७ जानेवारीला २.३० ते ३.३० वा दरम्यान चोरुन नेली. याबाबतची माहीती आरपीएफ पोलीस इस्पेक्टर श्री. मीना यांनी लोहमार्ग पोलिस ठाणे भुसावळ यांना कळविली. जीआरपी पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी विजय घेरडे यांनी सीसीटीव्ही मॉनीटरींग कक्षात रेल्वे स्टेशन येथील सीसीटीव्ही फुटेजचे बारकाईने तपासणी केली.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरटा झाला कैद
सीसीटीव्ही तपासणी दरम्यान पाठीवर सँगबॅग व स्वेटर घातलेला एक संशईत इसम ट्रेनमधुन उतरल्याचे दिसून आले. फुटेजची बारकाईने तपासणी केली असता, हा व्यक्ती रेल्वे स्टेशन बाहेर गेला व परत रेल्वे स्टेशनवर येवून पुणे- दाणापुर एक्सप्रेस मधुन पसार झाला. हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे व त्याचे नाव राहुल सुभाजी रोकडे (वय २७, रा. खंडवा) असे असल्याचे प्राथमीक तपासात निष्पन्न झाले.
मोबाईलवरून मिळाले लोकेशन
गोपनिय बातमीदाराकडुन आरोपीचा मोबाईल क्रमांक हस्तगत केला व तात्काळ सायबर सेल लोहमार्ग औरंगाबाद यांना संपर्क केला असता, सायबर सेलचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक जगताप व पोलीस अमंलदार पाटील यांनी तात्काळ मोबाईल क्रमांकाचे लोकेशन हे नारायण नगर, खंडवा येथील असल्याचे तपास पथकाला कळविले. तात्काळ पोलीस निरीक्षक घेरडे यांनी पोलीस अधिक्षक मोक्षदा पाटील यांना माहिती कळविली. यानंतर नारायण नगर, खंडवा पथक रवाना केले. पथकाने आरोपीच्या घरी छापा टाकुन आरोपी तेथुन पळुन जाण्याची तयारी असतांना त्यास पकडले व त्याचेकडुन सँगबॅग त्यामध्ये लेनोओ कंपनीचा लॅपटॉप असा एकूण १ लाख ५४ हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला.


