भुसावळ – येथील अग्रवाल महिला मंडळांतर्फे भागीरथी प्राथमिक विद्यालयातील लहान मुलांना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले.
.कोरोनाकाळानंतर सर्वांनाच विशेषतः आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या मुलांना येत असलेल्या अडचणी लक्षात घेऊन,अग्रवाल महिला मंडळाच्या अध्यक्षा शितल अग्रवाल यांनी मुलांना अभ्यासासाठी लागणारे साहित्य वह्या, पेन, पट्टी, पेन्सिल, रबर व खाऊ वाटप केले.
या प्रसंगी बोलताना त्यांनी सांगितले की मुलांच्या चेह-यावरील आनंद सगळ्यात महत्त्वाचा असतो, आणि त्या साठी अजून आम्ही जे आवश्यक असेल ते करू.
या प्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून सक्षम कौन्सिलींग सेंटरच्या आरती चौधरी, जयश्री दवे, अग्रवाल महिला मंडळाच्या अध्यक्षा शितल अग्रवाल, सेक्रेटरी नेहा अग्रवाल, सरीता अग्रवाल, अर्चना अग्रवाल, पुष्पा अग्रवाल उपस्थित होते.
संगीता अग्रवाल रत्नकांता अग्रवाल यांचे सहकार्य लाभले
तसेच मुख्याध्यापक अजय फेगडे सर, इतवारे सर, सविता वानखेडे व भावना पाटील किरण चौधरी
आदीं उपस्थित होते .



