संत गजानन महाराजांच्या दिंडीचे ठिकठिकाणी स्वागत : साकळी येथून शेगावसाठी दिंडी रवाना :

यावल : संत श्री गजानन महाराजांचा जयघोष करत गुरुवारी सकाळी साकळी येथून शेगावसाठी दिंडी रवाना झाली. साकळी गावात ठिकठिकाणी या दिंडीचे स्वागत करण्यात आले. साकळी येथील श्री सच्चिदानंद स्वरूप बहुउद्देशीय संस्था संचलित श्री संत गजानन महाराज फाउंडेशनने साकळी ते शेगाव दिंडीचे आयोजन केले होते. गुरुवारी ही दिंडी वाहनाद्वारे शेगावकडे रवाना झाली. तत्पूर्वी, मनवेल रोडवरील जोशी फार्ममधील संत गजानन महाराजांच्या मंदिरात मनोज व शीतल शिरसाळे, मुकेश व सविता बोरसे यांच्याहस्ते महाभिषेक झाला. नंतर मंदिरापासून साकळी गावाच्या श्री वाडेश्वर महादेव मंदिरापर्यंत पायी वारी निघाली. तेथून वाहनाने दिंडी पुढे शेगावकडे मार्गस्थ झाली. यंदा या दिंडीचे 11वे वर्ष आहे.

यावल शहरात झाले स्वागत :
साकळी ते शेगाव दिंडीचे यावल शहरात देखील स्वागत झाले. भुसावळ रस्त्यावरील युवा सम्राट सुपर मॉल येथे फाउंडेशनचे अध्यक्ष अनिल जोशी, उपाध्यक्ष ईश्वर बडगुजर, कार्याध्यक्ष हर्षल बाविस्कर आदींचा व्यवस्थापक संदीप सोनवणे यांनी स्वागत केले. त्यानंतर दिंडी पुढे शेगावकडे मार्गस्थ झाली. यंदा या दिंडीचे 11वे वर्ष आहे. दिंडीच्या यशस्वितेसाठी श्री संत गजानन महाराज फाउंडेशनचे अध्यक्ष अनिल जोशी, उपाध्यक्ष ईश्वर बडगुजर, कार्याध्यक्ष हर्षल बाविस्कर यांच्यासह भक्त परीवाराने परीश्रम घेतले.