बापरे कोरोना पुन्हा डोके वर काढू लागलाय – जिल्हयात कोरोनाच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ : भुसावळसह जळगाव जिल्ह्यात 88 रुग्ण आढळले –

जळगाव : जिल्ह्यात कोरोनाचे संकट वाढले असताना एकाच दिवसात 88 रुग्ण आढळल्याने जिल्हा प्रशासनात खळबळ उडाली आहे. नागरीकांकडून कोरोना नियम धाब्यावर बसवले जात असल्याने प्रशासनाने धडक कारवाई करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. गेल्या 24 कोरोनाचे तब्बल 88 रुग्ण जिल्ह्यात आढळल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे.

दोन हजार 279 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू
जिल्ह्यात आतापर्यंत दोन हजार 579 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार, जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख 43 हजार 40 नागरीकांना कोरोनाची लागण झाली असून त्यातील एक लाख 40 हजार 238 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून शुक्रवारी एका रुग्णाने कोरोनावर मात केली.
या शहरात आढळले नव्याने बाधीत
जळगाव शहर 31
जळगाव ग्रामीण 00
भुसावळ 24
अमळनेर 00
चोपडा 27
पाचोरा 00
भडगाव 00
धरणगाव 00
यावल 02
एरंडोल 00
जामनेर 00
रावेर 01
पारोळा 00
चाळीसगाव 03
मुक्ताईनगर 00
बोदवड 00
अन्य जिल्हा 00