अजमेर येथील गुन्ह्यातील आरोपी भुसावळात पोलिसांच्या जाळयात ; बाजारपेठ गुन्हे शोध पथकाची कारवाई :


भुसावळ – राजस्थान राज्यातील अजमेर येथील गुन्हयामध्ये पोलिसांना हवा असलेला आरोपीस भुसावळ बाजारपेठ गुन्हे शोध पथक पोलिसांनी आज शुक्रवार दिनांक 7 रोजी हिरा हाॅल खडका रोड भागातुन जेरबंद केले .
आज रोजी दि.07/01/2021 रोजी भुसावळ बाजार पेठ पोलीस स्टेशनला जी.आर.पी. पोलीस .स्टेशन. अजमेर ( राजस्थान) येथील भाग 5 गुरन 76/2021 भादवी कलम 380 गुन्हा दि.19/12/2021रोजी दाखल असुन त्या गुन्हात संशयित पाहीजे असलेल्या आरोपी शेख रईस शेख रशिद वय 25( रा. मुस्लिम काॅलनी खडका रोड भुसावळ) हा जी.आर.पी.पोलीस पथक अजमेर यांना पाहीजे असल्याने त्यांनी पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांना भेटून पोलीस मदत मागितली. त्यावरुन पोलीस निरीक्षक यांनी त्वरीत गुन्हे शोध पथकाला मदत करण्याचे आदेश दिले.
त्यानुसार भुसावळ शहरातील मुस्लिम काॅलनी खडका रोड भागात गुप्त बातमीदारा कडुन माहीती काढून संशयित आरोपी शेख रईस शेख रशिद यास हिरा हाॅल खडका रोड भागातुन सापळा रचून ताब्यात घेण्यात आले . दरम्यान पुढील कार्यवाही करीता जी.आर.पी पोलीस स्टेशन अजमेर (राज्य राजस्थान )या पोलिस पथकाच्या ताब्यात आरोपीस देण्यात आले आहे.
यांनी केली कारवाई …
सदर ची कार्यवाही उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे, पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक महेश घायतड पोलीस ना. निलेश चौधरी, दिनेश कापडणे, पो.काॅ.ईश्वर भालेराव ,पो.ना.गोपाल गव्हाळे पो.काॅ. सागर वंजारी अशांनी केली आहे.