सावित्रीबाई यांचा आदर्श महिलांनी आचरणात आणावा – अरुणाताई इंगळे : क्रान्तिज्योति सावित्रीमाई फुले यांचा जिवन प्रवास एकांकीका व लघुनाटीकेद्वारे सादर ; जायन्ट्स वसुंधरा सहेली गृपचा स्तुत्य उपक्रम :

भुसावळ – महात्मा ज्योतिबा फुले व क्रान्तिज्योति सावित्रीमाई फुले या दांपत्याचे महान त्यागाने आज महिलांना सन्मान मिळाला आहे समानतेचा अधिकार मिळाला स्त्रियांवरील अन्याय लक्षात घेवून सावित्रीबाई अन्याया विरुद्ध लढल्या व इतिहास घडवला महिलांनी सावित्रीबाई यांचा आदर्श आचरणात आणावा न डगमगता समाजकार्य करावे असे प्रतिपादन कार्यक्रमाचे प्रमुख वक्त्या दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या ,महाराष्ट्र महिला विभाग प्रमुख श्रीमती अरुणाताई इंगळे यानी केले .
येथील जायन्ट्स वसुंधरा सहेली गृपतर्फे विकास कोलनी येेथील हनुमान मंंदीर प्रांगण वर आयोजित याकार्यक्रम प्रसंगी श्रीमती इंगळे यांनी सावित्रीमाई फुले यांच्या कार्य व समाजसेवेचे व्रत यांवर प्रकाशझोत टाकला . कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार उज्वला बागुल ,सखीश्रावणी बहुउद्देशीय संस्था अध्यक्ष सौ .राजश्री नेवे, समाजसेविका श्रीमती शैला सावंत आदीं उपस्थित होते .

प्रारंभी उपस्थित सावित्रीच्या लेकीनीं दीपप्रज्वलन करून सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले . प्रमुख पाहुणे यांनी मनोगत व्यक्त केले .
दरम्यान रुपाली पाटणकर यांनी “मी सावित्रीमाई बोलतेय यांवर सादर केलेली एकांकिका लक्षवेधी ठरली. तसेच सावित्रीमाई यांचा जीवनपट व कार्याची महती लघुनाटीकेद्वारे रुपाली पाटणकर(सावित्रीबाई ) रेखा सोनवणे (महात्मा ज्योतिबा फुले ) सह कलाकार मीना राजपूत, अनिता ठाकरे, यांनी अतिशय सुंदररित्या सादर केली .प्रसंगी उपस्थित श्रोत्यानी टाळ्यांच्या गजरात भरभरून दाद दिली .

यावेळी सूत्रसंचालन सौ . यावेळी सूत्रसंचालन सौ . दिपाली अहिरेतर अध्यक्ष महानंदा पाटील यांनी प्रास्ताविकात जायन्ट्स वसुंधरा सहेली गृपचे कार्य व महती विशद केली तर उपाध्यक्ष राजश्री बादशहा यांनी आभार मानले.
यशस्वितेकरीता गृप अध्यक्षासहउपाध्यक्ष राजश्री बादशहा , सचिव रूपाली पाटणकर , कोषाध्यक्ष मंदाकिनी केदारे , तीलोत्तमा जावळे , जोस्ना कुलकर्णी, कविता महाले , रेखा सोनवणे, अनिता ठाकरे ,मीना राजपूत , ज्योती पवार , अंजली वाघमारे , नीलिमा पाटील सर्व सदस्य यांनी परिश्रम घेतले .
यावेळी सौ सुनंदा शिरसाड , कल्पना पाटील ,लता पाटील, हर्षा भावसार ,माला चौधरी ,शारदा धांडे ,जयश्री ताई , आचल पाटील , दिव्या सनन्से, मायाताई चौधरीं , योगिता ताई व परिसरातील सर्व महिलावर्ग नागरिक उपस्थित होते .

दिपाली अहिरे