ऍड निलेश भंडारी यांची मराठा सेवा संघ भुसावळ साठी तालुका अध्यक्ष म्हणून निवड :

           भुसावळ -  मराठा सेवा संघ जळगाव जिल्हा कार्यकारिणीची त्रैमासिक बैठक व मराठा सेवा संघ भुसावळ साठी तालुकाध्यक्ष निवड करणे बाबत दि 02 जानेवारी2022 रोजी शासकीय विश्राम गृह भुसावळ येथे आयोजित करण्यात आली होती. त्यात मराठा सेवा संघाची नवीन बांधणी व तालुकाध्यक्ष निवडीबाबत काही महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत.
   सदर बैठकीत ऍड निलेश भंडारी यांची त्यांचे सामाजिक बांधिलकी व कार्ये विचारात घेऊन शिवश्री अनिल पाटील जिल्हाध्यक्ष मराठा सेवा संघ जळगाव यांनी तालुकाध्यक्ष मराठा सेवा संघ भुसावळ म्हूणून नियुक्ती केली. 
     तसेच भुसावळ मधील प्रा श्री शरद पाटील सर यांची कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली त्याबद्दल त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.

सोबत मराठा क्रांती दिनदर्शिका 2022 याचेदेखील प्रकाशन करण्यात आले.
यावेळी मराठा सेवा संघाचे शिवश्री अनिल पाटील (जिल्हाध्यक्ष), शिवश्री दिनेश कदम (प्रचार प्रमुख),शिवश्री महेंद्र पाटील (जिल्हा उपाध्यक्ष),शिवश्री योगेश पाटील (जिल्हा कार्याध्यक्ष), शिवश्री दिलीप पाटील (जिल्हा कार्याध्यक्ष), शिवश्री गिरीश पवार (जिल्हा सहसचिव), शिवश्री किरण पाटील (जिल्हा सहकोषाध्यक्ष), शिवमती कल्पनाताई पाटील (जिजाऊ ब्रिगेड), शिवश्री विजय देवरे, शिवश्री अशोक पाटील, शिवश्री गुणवंत शेजोळे, शिवश्री शरद पाटील सर, शिवश्री अलकाताई मराठे, शिवश्री ऍड निलेश भंडारे, शिवश्री शैलेश पाटील सर, शिवश्री ऍड तुषार पाटील, शिवश्री अमोल पाटील आदी मंडळी उपस्थित होते.