भुसावळ – येथील भुसावळ कला, विज्ञान व पू. ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालय आणि महाविद्यालयातील इतिहास विभागाअंतर्गत ‘व्यक्तिमत्व वि hiकास’ या विषयावर व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन प्राचार्य डॉ. एम. व्ही. वायकोळे ह्या उपस्थित होत्या.
तसेच व्यासपीठावर उपप्राचार्य डॉ. बी. एच्. बऱ्हाटे, इतिहास विभाग प्रमुख प्रा. डॉ. प्रफुल्ल इंगोले उपस्थित होते. स्वागत व सत्कार समारंभ संपन्न झाल्यानंतर प्रा. मुकेश चौधरी यांनी व्यक्तिमत्व विकास या विषयावर मार्गदर्शन केले. त्यात त्यांनी बाह्य रूप हा व्यक्तिमत्त्वाचा एक भाग आहे, बाह्य रूपावरून व्यक्तिमत्त्वाचे मूल्यमापन करणे चुकीचे आहे. तसेच अंतरंग हा व्यक्तिमत्त्वाचा गाभा आहे. मानवात तज्ञते बरोबरच माणुसकी असली पाहिजे असे सांगितले, तसेच महाविद्यालय हे व्यक्तिमत्त्व विकासाचे केंद्र आहे, व्यक्तीचा शारीरिक, भावनिक व मानसिक क्षमतांचा विकास झाला पाहिजे. आत्मकेंद्री पणा सोडून अपयश व चुकांतून शिकले पाहिजे व चांगुलपणाची जपणूक केली पाहिजे असे त्यांनी मांडले. अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. एम . व्ही. वायकोळे यांनी सकारात्मकता व्यक्तिमत्व विकासाची गुरुकिल्ली आहे असे नमूद केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. ललीत तायडे यांनी केले. प्रास्ताविक इतिहास विभाग प्रमुख प्रा. डॉ. प्रफुल्ल इंगोले यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ किरण वारके यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपप्राचार्य डॉ. एस . व्ही. पाटील, उपप्राचार्य डॉ. बी. एच . बऱ्हाटे, उपप्राचार्य डॉ. एन. ई. भंगाळे यांच्या मार्गदर्शनानुसार प्रा. एस. टी. धूम, प्रा. डॉ. राजेंद्र नाडेकर, प्रा. श्रीपाद वाणी, प्रा. उज्जवला महाजन, प्रा. शीतल सोनवणे यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी मराठी विभाग प्रमुख प्रा डॉ. के. के. अहिरे, प्रा डॉ. जे एफ. पाटील तसेच मानव्य विद्या शाखेतील प्राध्यापक व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होेते.



