भुसावळ शहरात सहा ठिकाणी नाकेबंदी व कारवाई :

भुसावळ -भुसावळ शहरांमध्ये सहा ठिकाणी नाकाबंदी लावलेली आहे.त्याशिवाय पेट्रोलिंग पथके सुद्धा नेमण्यात आलेली आहे हायवे रोडवरील धाबे हॉटेल्स चेक करण्यासाठी स्वतंत्र पथके लावलेली आहे नाकाबंदी मध्ये बिना मास्क असणार्‍यांवर कारवाई केली जात आहे ड्रंक अँड ड्राइव्ह च्या केसेस करण्यात येत आहे जे लोक नशा करून तो वाहने चालवित आहे याशिवाय मोटर व्हीकल ॲक्ट खाली कारवाया करण्यात येत आहे जे लोक विनाकारण काम वगळता फिरत आहे या दृष्टीने बंदोबस्ताचे प्लॅनिंग केलेले आहे

आज रोजी रात्री दोन वाजेपर्यंत नाकाबंदी व पेट्रोलिंग असणार आहे. नवीन वर्षानिमित्त शासनाच्या नवीन गाईडलाईन प्राप्त झालेल्या नुसार कारवाई सुरू राहणार आहे जे नागरिक कामाव्यतिरिक्त विनाकारण फिरणाऱ्यांवर पाचशे रुपये प्रमाणे दंडात्मक कारवाई करणार आहे ज्या काही अस्थापना वेळेव्यतिरिक्त उघडी असल्यास त्यावर कलम 188 प्रमाणे कारवाई करण्यात येणार आहे रात्री 9:00 वाजे पासून जमावबंदी आदेश लागू करण्यात आले असून या ठिकाणी पाच पेक्षा जास्त व्यक्ती आढळून आल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येणार असून दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस उपविभागीय अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांनी दिली.

यावेळी पोलीस उपविभागीय अधिकारी सोमनाथ वाघचौरे बाजारपेठ पोलिस स्टेशनचे निरीक्षक दिलीप भागवत नगर पालिकेचे मुख्याधिकारी संदीप चिद्रवार तसेच पोलीस कर्मचारी व नगरपरिषदेचे कर्मचारी उपस्थित होते.