नववर्षात साकेगावला रंगणार क्रिकेटचा थरार ; आठ संघ भिडणार ;

भुसावळ:- शहरालगत साकेगाव येथे नववर्षात टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा थरार होणार असून जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर गावातील स्थानिक आठ संघ भिडणार आहे, स्पर्धा मॉर्निंग सी सी तर्फे आयोजित करण्यात आलेली आहे.

महामार्गालगत असलेल्या जि प शाळेच्या मैदानावर शनिवारी चार तर रविवारी तीन सामने होणार आहेत स्पर्धेसाठी मॉर्निंग सीसी चे सर्व खेळाडू, क्रिकेटप्रेमी तसेच गावातील प्रतिष्ठित नागरीकांचा सहकार्य लाभत आहे. खेळाडूंनी श्रमदानातून मैदानाची सफाई व आखणी केली.

स्पर्धेतील विजेता, उपविजेता, उत्कृष्ट गोलंदाज ,फलंदाज ,खेळाडू यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देण्यात येणार आहे.

असे होणार सामने

एम्पायर मल्हार विरुद्ध जय बजरंग

मातृभूमी विरुद्ध सिंगापुर सीसी

जय महाराष्ट्र विरुद्ध योद्धा

रॉयल भानखेडा विरुद्ध वीर भगतसिंग