वरणगाव – शिवसेनेतर्फे घोषणाबाजी करून पोलीस स्टेशनला दिले निवेदन वरणगाव – जिल्हा बँक संचालिका ऍड.रोहिणी खडसे-खेवलकर यांनी शनिवारी प्रसारमाध्यमातुन बोलताना शिवसेना जिल्हाप्रमुख मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्याबद्दल बेताल वक्तव्य केले होते. या वक्तव्याचा निषेध म्हणून आज रविवार रोजी सकाळी वरणगाव शिवसेनेतर्फे पोलीस स्टेशनला रोहिणी खडसे यांच्याबद्दल निवेदन देण्यात आले. आमदार चंद्रकांत पाटील यांना ‘चोप’ देऊ अशी अशोभनीय बेताल वक्तव्य केल्याप्रकारणी शिवसेना वरणगावतर्फे बस स्टँड चौकात रविवारी ऍड. रोहिणी खडसे-खेवलकर यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून पोलीस स्टेशनला शिवसेनेतर्फे निवेदन देण्यात आले. याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन सर, जिल्हा संघटक विलास मुळे, पंचायत समिती सदस्य विजय सुरवाडे, मुस्लिम समाजाचे नेते सय्यद जाफर अली उर्फ हीपीसेठ, उपतालुका प्रमुख सुभाष चौधरी, युवा सेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत शर्मा, संतोष माळी, आबा सोनार, प्रल्हाद माळी, अमर सोनार, अतुल पाटील, मितेश पाचपोळ, प्रकाश कोळी, सम्राट पाटील, सुनील भोई, उल्हास भारसके, विजय पाटील, नितीन पाटील, कृष्णा पाटील, किरण माळी, पवन चौधरी, दिपक बढे, भूषण राणे, कृष्णा पुजारी, विलास पाटील, गिरीश माळी, साईचरण चौधरी, हर्षल वंजारी, यशवंत बढे, उमाकांत झांबरे, निलेश काळे, योगेश कोळी, सुधाकर चौधरी, विलास पाटील, प्रभाकर पाटील, सुभाष चौधरी, किशोर कोळी, रमेश सुरवाडे, प्रवीण पाटील, राहुल वंजारी यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.