मुक्ताईनगर — शहरात दोन ठिकाणी घरी जाऊन शिवीगाळ केल्याप्रकरणी परस्पर गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यातील संशयितांची संख्या 29 वर पोहोचली आहे.
यासंदर्भात मुक्ताईनगर शहरातील उषा सुनील पाटील यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे त्यात म्हटले आहे की मुक्ताईनगर येथील शिवराज पाटील अजय जैन व त्यांच्या सोबत असलेल्या इतर सात जणांनी मुक्ताईनगर येथील शिवराय नगरातील सुनील पाटील यांच्या घरी काल 24 डिसेंबर 20 21 रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास येऊन घरात फिर्यादी उषा सुनील पाटील असताना त्यांचे पती कुठे गेले अशी शिवीगाळ करून विचारणा केली इतकेच नव्हे तर अश्लील शिवीगाळ करून धक्काबुक्की केली तसेच फिर्यादी महिलेचा पदर ओढून वाटेल असे कृत्य केले या वरून शिवराज पाटील अजय जैन व इतर सात संशयितांवर भादवि कलम 354 452 प्रमाणे गुन्हादाखल करण्यात आला आहे.
तर दुसरी फिर्याद बोदवड रोड वरील मराठा मंगल कार्यालय जवळ राहणाऱ्या नीता शिवराज पाटील यांनी दाखल केली आहे या फिर्यादीत म्हटले आहे की ईश्वर हटकर सुनील पाटील व इतर वीस जणांनी 24 डिसेंबर 20 21 रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास फिर्यादी यांच्या घरा समोर येऊन मोठमोठ्याने आरडाओरडा करू लागले व अश्लील शिवीगाळ करून फिर्यादीच्या पतीस जीवे ठार मारण्याची धमकी दिली यावरून 22 संशयितांवर भादवि कलम 354 , 141 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशाप्रकारे दोन्ही गुन्ह्यातील संशयित आरोपींची संख्या 29 वर पोहोचली आहे.



