चोपडयाचे आमदार लताताई सोनवणे कोरोना पॉझिटीव्ह…!

– चोपडा तालुक्याचे आमदार सौ. लताताई सोनवणे कोरोना पॉझिटीव्ह आल्या आहेत. आरोग्य विभागाला प्राप्त झालेल्या अहवालात आमदार सौ. सोनवणे यांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. 310 जणांचा रिपोर्ट प्राप्त झालाआहे. त्यापैकी केवळ दोनच जणांना कोरोनाची लागण झाली आहे.त्यात नांद्रा येथील एक रुग्ण आहे.

जळगाव जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्येत घट होत असताना गेल्या 24 तासात कोरोनाचे 2 रुग्ण आढळले आहेत. एका रुग्णाने कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 2 हजार 579 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार, जिल्ह्यात आतापर्यंत 1 लाख 42 हजार 810 नागरिकांना कोरोनाची लागण झाली असून त्यातील एक लाख 40 हजार 225 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली.

जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार चाळीसगाव तालुक्यात 60 वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत दोन हजार 579 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.नागरिकांनी कोरोनाचे नियम पाळायचे आहेत ,असे आवाहन प्रशासनाने केले आहे.