दिपनगर येथील सेंट्रल बँकेचा 111 वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळेस अतुल कुमार अग्रवाल (व्यवस्थापक) याच्या हस्ते सर सोराबजी पोचखानवाला यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दिप प्रज्वलन करण्यात आले.
या वेळी अग्रवाल साहेबानी सर पोचखानवाला यांनी स्थापन केलेल्या स्वदेशी बँक मोठ्या मेहनतीने स्थापन करून आम जनतेला चांगल्या सुविधा दिल्या नंतर स्व.इंदिरा जी यांनी बँकेचे राष्ट्रीयकरण केले.
या वेळी पी.डी. सोनवणे,लोकेश सपकाळे यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शैलेंद्र सपकाळे यांनी केले .
या वेळी कार्यक्रमाला विवेक ठाकूर (सह व्यवस्थापक )अनिल इंगळे सुनिल अटकाळे , राजु वराडे,दिनेश साळवे, गणेश लहाने , सोनवणे पोलिस कर्मचारी इ उपस्थित होते.



